upsc allows civil services candidates to change exam centres for prelim and mains | Sarkarnama

यूपीएससीचा महत्वाचा निर्णय : उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाने उमेदवारांना पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना आता त्यांच्या सोईचे परीक्षा केंद्र निवडता येईल.  

नवी दिल्ली : केद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) यावर्षी 4 ऑक्टोबरला सनदी सेवेची पूर्व परीक्षा जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना सोईचे केंद्र निवडण्याची मुभा आता यूपीएसससीने दिली आहे. याबद्दल उमेदवारांकडून मागणी होत असल्याने यूपीएससीने हा निर्णय घेतला आहे. 

सनदी सेवा पूर्व परीक्षा 2020 साठी मोठ्या प्रमाणात उमेदवार बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचवेळी भारतीय वन सेवेचीही पूर्व परीक्षा होणार आहे. अनेक उमेदवारांनी यूपीएससीकडे त्यांना मिळालेली परीक्षा केंद्रे बदलून मिळावीत, अशी मागणी केली होती. आता यूपीएससीने उमेदवारांना त्यांच्या पसंतीची परीक्षा केंद्रे सादर करण्यास सांगितले आहे. परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय सनदी सेवा (मुख्य) परीक्षा 2020 आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2020 साठीही हा निर्णय लागू असेल. 

उमेदवारांना पसंतीची परीक्षा केंद्रे सादर करण्याची विंडो 7 ते 13 जुलै (सायंकाळी 6 पर्यंत) आणि 20 ते 24 जुलै 2020 (सायंकाळी 6 पर्यंत) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन वरील परीक्षेसाठी त्यांच्या पसंतीची परीक्षा केंद्रे सादर करावीत. संबंधित परीक्षा केंद्रांवरील उपलब्ध आसन क्षमता लक्षात घेऊन उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे संकेतस्थळ मिळेल, असे यूपीएससीने म्हटले आहे. 

पसंतीचे केंद्र मिळण्याचा मुख्य निकष हा प्रथम पसंती सादर करणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर असेल. संबंधित परीक्षा केंद्रांची क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी पसंती नोंदवता येणारनाही . पसंतीचे परीक्षा केंद्र न मिळालेल्या उमेदवारांना उरलेल्या केंद्रांमधून निवड करावी लागेल, असे यूपीएससने नमूद केले आहे. 

मोदी, शहांनी वारकऱ्यांना दिल्या चक्क मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

नवी दिल्ली : आषाढी वारीवर यंदा कोरोना महामारीचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर थेट वारीत जाण्याऐवजी वारकरी घरातूनच लाडक्या विठुरायाची आठवण काढत आहेत. आजच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वारकरी बंधू -भगिनींना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. 'सकळ देवांचे माहेर | सकळ संतांचे निजमंदिर | ते हे पंढरपूर जाणावे ||' हा संत एकनाथांचा अभंगही अमित शहा यांनी उद्धृत केला आहे. मोदी आणि अमित शहा यांनी ट्विटरवर आषाढी एकादशीनिमित्त मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी म्हटले आहे की, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख