लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढविण्याचा 'या' राज्याने घेतला निर्णय

केंद्र सरकारने 1 जूनपासून केवळ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता इतर झोनसाठी राज्यांना निर्णय घेण्यास सांगण्यात आले असून, आता तमिळनाडूने लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
tamilnadu extends coronavirus lockdown till june 30
tamilnadu extends coronavirus lockdown till june 30

चेन्नई : राज्यातील लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने रविवारी जाहीर केला. राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले असून, सार्वजनिक वाहतूक काही प्रमाणात सुरू करण्यास आणि कामाच्या ठिकाणी अधिक कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. 

याविषयी बोलताना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी म्हणाले की, धार्मिक स्थळे, आंतरराज्य बस वाहतूक, मेट्रो आणि उपनगरी रेल्वेसेवा यावरील निर्बंध कायम राहतील. सार्वजनिक बस वाहतूक 1 जूनपासून सुरू होईल. मात्र, चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि चेंगलपेट जिल्ह्यांमध्ये बस वाहतुकीस परवानगी देण्यात आलेली नाही. खासगी बसना काही मार्गांवर परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी 30 जूनपर्यंत कायम राहणार आहे. 

तमिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. राज्यात मागील 24 तासांत कोरोनाचे 938 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 21 हजार 184 वर पोचली आहे. राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता इतर झोनमध्ये कामाच्या ठिकाणी अधिक कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. याचबरोबर सोन्याची दुकाने पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मॉल बंदच राहतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. 

केंद्र सरकारकडून निर्बंध शिथिल 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा चौथा लॉकडाउन आज संपत असल्याने केंद्र सरकारने लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन केवळ कंटेन्मेंट झोनपुरता मर्यादित असेल आणि तो 30 जूनपर्यंत राहील, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. यामुळे कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध पुढील महिनाभर कायम राहणार आहेत. सरकारने कंटेन्मेंट झोनसाठीच लॉकडाउन जाहीर केला असून, इतर झोनमध्ये बंद करण्यात आलेल्या गोष्टी 1 जूनपासून पुन्हा सुरू होतील.  तसेच, रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत सामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असेल. याचबरोबर सरकारने इतर झोनमधील लॉकडाउन उठविण्याचे टप्पे जाहीर केले आहेत. 

पहिला टप्पा 
धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि आदरातिथ्य सेवा तसेच, शॉपिंग मॉल 8 जूनपासून सुरू होणार 

दुसरा टप्पा 
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था आदी. सुरू करण्याचा निर्णय संबंधित राज्यांशी विचारविनिमय करुन केंद्र सरकार घेणार जुलै महिन्या घेणार  

तिसरा टप्पा 
परस्थितीचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो, चित्रपटगृहे, जिम, एंटरटेन्मेंट पार्क, नाट्यगृहे, बार, प्रेक्षागृहे खुली करण्याचा निर्णय घेतला जाणार 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com