'मन की बात' मधून मोदींनी 'यांचे' केले कैातुक 

अनेक वस्तू देशातच तयार करून त्याला बाजारपेठ कशी निर्माण करता येईल, याबाबत प्रयत्न सुरू आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
Narendra Modi
Narendra Modi

पुणे : देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार, उद्योग, व्यवसाय निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज 'मन की बात'मध्ये सांगितले. अनेक वस्तू देशातच तयार करून त्याला बाजारपेठ कशी निर्माण करता येईल, याबाबत प्रयत्न सुरू आहे, असे मोदी यांनी नमूद केले.  

मोदी यांनी 'मन की बात'मध्ये आत्मनिर्भर भारत, जागतिक योग दिन, पर्यावरण दिन आदी बाबत विचार मांडले. लॅाकडाउनच्या काळात देशातील अनेक नागरिकांनी उल्लेखनीयउपक्रम राबविले, या सर्वांचे मोदी यांनी कैातुक केले. सटना (ता. नाशिक) येथील राजेंद्र जाधव यांनी टॅक्टरच्या माध्यमातून सॅनिटायझर मशिन तयार केले. या माध्यमातून जाधव
यांनी परिसर सॅनिटाइज करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. राजेंद्र जाधव यांच्या या कार्याचे मोदी यांनी विशेष कैातुक केले. आगरताला येथील गैातमताल यांनी गावातील अनेकांना लॅाकडाउनच्या काळात जेवण दिले. हिमाचल प्रदेश येथील हिमांशू यांनी 'नमो' अॅपच्या माध्यमातून भारत अनेक वस्तू कशा आपल्या देशातच तयार करू शकतो, याबाबत सांगितले.
पठाणकोट येथील दिव्यांग राजू यांनी तीन हजार मास्क दिले तसेच शंभर कुंटुबांची जेवणाची व्यवस्था केली. या सर्वांच्या कार्यांची दखल मोदी यांनी मन की बात मध्ये घेतली.  रेल्वे कर्मचारी हे कोरोना योद्धा असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक महिला बचत गट, सामाजिक संस्थांनी मजूर, कामगारांना मदत करून आधार दिला, या सगळ्यांचा मोदी यांनी उल्लेख करून कैातुक केले. 
  

'मेक इन इंडिया'

परप्रांतिय मजूर, कामगार यांच्या विकासासाठी केंद्र सरकार महत्वाचे पाऊल उचलणार आहे. आपल्या गावातच ते काय उद्योग, व्यवसाय करू शकतील, याविषयी चाचपणी सुरू आहे.  'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून लोकल वस्तू बनवून त्यांना बाजारपेठ कशी निर्माण होईल, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. लॅाकडाउनचा सर्वात जास्त फटका बसला तो कामगारांना. त्यांना झालेला त्रास शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांना परत त्यांच्या गावी पाठविण्यासाठी रेल्वेने श्रमिक रेल्वेची व्यवस्था केली आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतमहत्वाचे सहकार्य केले. त्यांनी या मजुरांना क्वारंटाइन करणे, त्यांची जाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था करून महत्वाचे काम केले आहे. ते कोरोनाचे योद्धा ठरले आहेत, असे मोदी म्हटले आहे.   

'माय लाईफ माय योगा'

मोदी म्हणाले, जगातील अनेक नेते मला योग आणि आयुवैद याविषयी विचारत असतात. अनेक जण इंटरनेटच्या माध्यमातून योग शिकत आहेत. विविध प्राणायम केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने योग आणि आयुवैद यांना दिवसेंदिवस अधिक महत्व प्राप्त होत आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाव्दारे जागतिक योग दिनानिमित्त
'माय लाईफ माय योगा' ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी आपण करीत असलेला योगाचा तीन मिनिटांचा व्हिडिओ माहितीसह पाठवा, असे आवाहन मोदी यांनी  'मन की बात'मध्ये केले. 

कोरोनाविरूद्ध लढाई संपलेली नाही 

देशात सुरू असलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ 1 कोटी जनतेला मिळाला आहे. त्याचा ग्रामीण भागातील 80 टक्के जनतेला लाभ झाला आहे. यात महत्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. येत्या पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. यंदा जैवविविधता विषयावर यानिमित्ताने भर देण्यात येणार आहे. सध्या देशात कीटकच्या टोळधाडीमुळे त्रस्त झाला आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही. आपण सर्वांनी त्यांच्या मुकाबला करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com