कोरोना लसीकरणात महाराष्ट्रानं केला विक्रम; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

तिसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे.
Maharashtra sets record for corona vaccination
Maharashtra sets record for corona vaccination

मुंबई : देशात कोरोना (Covid-19) लसीकरणामध्ये महाराष्ट्रानं बुधवारी विक्रम केला आहे. मागील काही दिवसांत देशातील दैनंदिन लसीकरणाचा आकडा अनेकदा एक कोटीच्या पुढे गेला आहे. तर महाराष्ट्रानंही मागील काही दिवसांत दररोज 10 लाखांहून अधिक डोस दिले आहेत. तर बुधवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 14 लाख 39 हजार 809 डोस देत विक्रम केला आहे. (Maharashtra sets record for corona vaccination)

तिसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसची संख्या 6 कोटी 55 लाखांवर गेली आहे. तर देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लशीचा दुसरा डोस मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे. बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत सुमारे 14 लाख 39 हजार 809 डोस एका दिवसात देण्याची किमया आरोग्य विभागाच्या यंत्रणेने करून दाखवली आहे. हे आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण ठरले आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात बुधवारपर्यंत एकूण 6 कोटी 55 लाख 20 हजार 560 डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी देशात दुसरा डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. सर्वाधिक रुग्ण तसेच मृतांचा आकडाही महाराष्ट्रातच आहे. त्यातच आता तिसरी लाट येण्याची शक्यता असून ही लाट अधिक तीव्र असेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. लसीकरण हा त्यावरील एक उपाय असल्यानं राज्यात अधिक वेगानं लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे. 

मागील काही दिवसांतील लसीकरण
- 21 ऑगस्ट - 11,04,465
- 30 ऑगस्ट - 10,35,413
- 1 सप्टेंबर - 9,79,540
- 4 सप्टेंबर - 12,27,224 
- 8 सप्टेंबर - 14,39,809

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com