भारत-चीनमधील तणाव वाढतोय

भारत आणि चीनमधील तणाव वाढू लागला असून, लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे. भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
india china standoff at ladakh continue
india china standoff at ladakh continue

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चालला असून, तीन वर्षांपूर्वीच्या डोकलाम वादानंतर उभय देशांचे सैन्य पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. चीनच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने देखील पेंगोंग त्सो आणि गाल्वान खोऱ्यातील लष्करी बळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच भागांत दीड ते दोन हजार चिनी सैनिक तैनात आहेत. चीनने याच भागात लष्करासाठी सोयीसुविधा उभारल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे. 

पूर्व लडाखमध्ये 5 मे रोजी सुमारे अडीचशे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. दुसऱ्या दिवसांपर्यंत हा संघर्ष सुरू होता. यात दोन्ही देशांचे शंभरहून अधिक सैनिक जखमी झाले होते. त्यावेळी स्थानिक कमांडरनी बैठक घेतल्यानंतर हा संघर्ष थांबला होता. यानंतर 9 मे रोजी उत्तर सिक्कीममधील पेंगोंग त्सो येथेही असाच प्रकार घडला होता. 

लडाखमधील भागावर चीन पूर्वीपासून आपला अधिकार सांगतो आहे . गाल्वान खोऱ्यावरून मात्र उभय देशांत कसलाही वाद नव्हता पण चीनने आता कारण नसताना या भागात आपले लष्कर तैनात केले असल्याची माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने दिली. या आधीही सीमावर्ती भागात अशाच प्रकारची तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांपूर्वी डोकलाममध्ये दोन महिने दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले होते. आता पूर्व लडाखमध्ये याचीच पुनरावृत्ती होताना दिसून येते. 

लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावर नेपाळचा आक्षेप 

काही दिवसांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी नेपाळवर टीका करताना नेपाळ कुणाच्या तरी सांगण्यावरून सीमा वादात पडत आहे असे विधान केले होते, त्यांच्या या विधानाला नेपाळकडूनच आक्षेप घेण्यात आला आहे. आतापर्यंत भारताच्या संरक्षणासाठी गोरखा सैनिकांनी मोठे बलिदान केले असून या बलिदानाचा हा अवमान असल्याचे नेपाळचे संरक्षणमंत्री ईश्वर पोखरेल यांनी म्हटले आहे. नरवणे यांचे विधान राजकीय स्टंट असल्याची टीका पोखरेल यांनी केली आहे. मध्यंततरी भारताने लिपूलेख टेकड्यांतून जाणारा मार्ग खुला केल्यानंतर नेपाळने त्याला आक्षेप घेतला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com