ट्रम्प म्हणतात, अमेरिका करेल कोरोनावर मात

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र, देश यातून बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त करीत मास्क लावता सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत.
donald trump said america will fight coronavirus
donald trump said america will fight coronavirus

बाल्टिमोर : आपण एकत्र येऊन कोरोना संसर्गावर मात करु, असा विश्‍वास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. मेमोरियल डेनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते. या वेळी त्यांनी अमेरिकेतील हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली. ट्रम्प यांनी या कार्यक्रमातही मास्क वापरला नाही. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ट्रम्प यांनी केलेल्या या दौऱ्यावर आता टीका होऊ लागली आहे. 

बाल्टिमोर येथील ऐतिहासिक किल्ला मॅकहेन्री येथील कार्यक्रमात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की, आपण सर्वजण मिळून कोरोना संसर्गावर मात करु आणि अमेरिका या संकटातूनच निश्‍चितच बाहेर येईल.अमेरिकेच्या प्रयत्नात कोणताच अडथळा किंवा आव्हाने येणार नाहीत. 
तत्पूर्वी ट्रम्प यांनी आर्लिंगटन नॅशनल सिमेट्री येथे देशातील हुतात्म्यांना अभिवादन केले. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी मास्क घातला होता. परंतु आदरांजलीचा कार्यक्रम मोकळ्या मैदानावर असल्याने त्यांनी मास्क काढून टाकले. त्यानंतर नागरिकांनी हुतात्मा सैनिकांच्या स्मारकास अभिवादन केले. ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घातलेले नव्हते. तसेच त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यानंतर ते बाल्टिमोर येथील मॅकेन्री किल्ल्याकडे रवाना झाले. 

दरवर्षी मेमोरियरल डेनिमित्त र्व्हजर्निया येथे स्मारकावर पुष्पचक्र वाहिले जाते. परंतु यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अभिवादनाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला. मॅकन्री येथे बोलताना अध्यक्ष ट्रम्प म्हणाले, की कोरोना संसर्गाच्या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी आज देशातील अनेक सेवा कर्मचारी आणि पोलिस काम करत आहेत. कोरोनाच्या विरोधातील लढाईत ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांसमवेत संपूर्ण देश उभा आहे, असे ते म्हणाले. 

महापौरांची दौऱ्यावर टीका 

यादरम्यान बाल्टिमोरचे महापौर आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य बर्नार्ड सी जॅक यंग यांनी कोरोना संसर्गाच्या काळात अध्यक्षांनी केलेल्या दौऱ्यावर टीका केली आहे. सध्याच्या काळात हा दौरा अनावश्‍यक होता आणि हे एक आदर्श उदाहरण ठरु शकत नाही, असे यंग म्हणाले. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स यूनिर्व्हसिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सोमवारी दुपारपर्यंत १६.५ लाख जणांना कोविड-१९ ची बाधा झाली असून त्यात ९ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com