लक्षणे नसल्यास प्रवाशांचे क्वारंटाइन नाही; `या` राज्याने घेतला निर्णय

देशांतर्गत विमाने, रेल्वे आणि बसने गुजरातला येणाऱ्या प्रवांशांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणे दिसली नाही तर त्यांना विलगीकरण केंद्रात न ठेवता थेट घरी पाठविण्यात येणार आहे.
gujarat government issues advisory for travelers
gujarat government issues advisory for travelers

अहमदाबाद : गुजरातला आलेल्या प्रवाशांनी घरी गेल्यानंतर १४ दिवस लक्षणांचे निरीक्षण करावे, जर या काळात कोरोनासंदर्भात लक्षणे आढळली तर अशा प्रवाशांनी त्वरित जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा १०४ व १०७५ या हेल्पक्रमांकावर माहिती द्यावी, अशा सूचना आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव जयंती रावी यांनी दिल्या आहेत. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांचे तातडीने विलगीकरण करण्यात येणार असून नंतर जवळच्या आरोग्य केंद्रात पाठविण्यात येणार आहे. गुजरातच्या आरोग्य विभागाने रविवारी (ता.२४) रात्री हा निर्णय जाहीर केला. 

आरोग्य विभागाच्या सूचना 

- साधारण आणि तीव्र लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना उपचारासाठी कोरोना रुग्णालयात पाठविणार 
- हलकी लक्षणे आढळणाऱ्यांना घरी एकांतवासात राहण्याचा किंवा कोरोना आरोग्य केंद्रात राहण्याचा पर्याय देणार 
- गुजरातमध्ये येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी होणार 
- प्रवांशांना मास्क लावणे व सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक 

परदेशी प्रवाशांनी विलगीकरण बंधनकारक 

आंतरराष्ट्रीय विमानसेवा ऑगस्टपूर्वी सुरू करण्याचे सूतोवाच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केल्यानंतर आता आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियमावली जारी केली आहे. या प्रवाशांना भारतात येताच 14 दिवसांपर्यंत विलगीकरणात (क्वारंटाइन) राहावे लागणार आहे. यातील सात दिवस स्वखर्चाने विलगीकरण केंद्रात राहणे बंधनकारक असेल. उर्वरित सात दिवस घरी विलगीकरणात राहता येईल. आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमावली जाहीर करताना काही श्रेणीतील प्रवाशांना क्वारंटाइन केंद्रात राहण्याच्या अटीतून वगळण्यात आले आहे. यात मानसिक आजारपण, गरोदर महिला, कुटुंबातील सदस्याचे निधन झाले असल्यास, गंभीर आजार तसेच दहा वर्षांपेक्षा कमी वयाची बालके यांना चौदा दिवसांपर्यंत होम क्वारंटाईनची परवानगी दिली जाऊ शकते. प्रवासादरम्यान आणि नंतर काय करावे तसेच काय करू नये याची यादी प्रवाशांना तिकिटासोबतच दिली जाईल. सर्व प्रवाशांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक असेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com