मुख्यमंत्र्यांचा कौतुकास्पद निर्णय : माझ्या वाहनांचा ताफा आला तरी वाहतूक थांबवू नका

हा आदर्श इतर मुख्यमंत्री घेतील का?
Basavraj Bommai ff
Basavraj Bommai ff

बंगळूर : शासकीय कार्यक्रमात हार-तुऱ्यांवर बंदी, सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या सलामीला ब्रेक लावल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai)  यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यासाठी असलेल्या शून्य वाहतूक (झिरो ट्राफिक) व्यवस्थेलाच हद्दपार करून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. (Karnatak CM cancels zero traffic for his convoy) 

मुख्यमंत्री बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वीच शासकीय कार्यक्रमात किंवा आपला सन्मान करण्यासाठी हार, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देण्यावर बंदी घालून त्याऐवजी पुस्तक देण्याची सूचना केली होती. त्यानंतर तसा अधिकृत आदेशही त्यांनी काढला. शुक्रवारी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सलामी (गार्ड ऑफ ऑनर) देण्याचे बंद करण्याची पोलिसांना सूचना केली होती. एवढेच नाही तर आपले कटआऊट्स किंवा आपल्या स्वागताचे होर्डींग्ज न लावण्याची कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिली होती.

मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे की, त्यांना बंगळूर शहरात झिरो ट्राफिक व्यवस्था नको आहे. बऱ्याचदा मुख्यमंत्री, मंत्री, किवा महत्वाचे राजकीय नेत्यांची वाहने जात असताना शून्य वाहतूक व्यवस्था असते. परंतु बोम्मई यांनी आपणास ही व्यवस्था नको असल्याचे सांगून सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. जेव्हा ते प्रवास करतील त्यावेळी सिग्नल  फ्री वाहतूक व्यवस्था करावी, अशी सूचना करून आपल्या प्रवाशावेळी रुग्णवाहिकेला जाण्यास मार्ग मोकळा असावा, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री येणार असल्याचे समजताच पोलिस अर्धा तास आधीच सर्वांची वाहने रोखून धरतात. परंतु आता बोम्मईच्या निर्णयामुळे अर्ध्या तासाहून अधिक काळ रस्त्यावर थांबणारी वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालूच रहाणार आहे. गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी यापूर्वीच आपणास शून्य वाहतूक व्यवस्था नको असल्याचे सांगितले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com