चीनकडून पुन्हा कुरापत; भारताच्या हद्दीत घुसखोरी

चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबद्दल भारतीय लष्कराने मात्र, अधिकृत भाष्य केलेले नाही.
Chinese Army has deployed troops at different locations in the Ladakh
Chinese Army has deployed troops at different locations in the Ladakh

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय सीमेवरील चीनच्या कुरापती वाढत चालल्या असून चीनचे लष्कर पूर्व लडाख भागात तीन किलोमीटरपर्यंत आत आले होते, गलवान खोऱ्यात चीनकडून ही घुसखोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान भारतीय लष्कराने मात्र यावर अद्याप भाष्य केलेले नाही. गलवान खोऱ्यात मोठ्या संख्येने चिनी लष्कर तैनात झाल्याचे समजते. खबरदारीचा उपाय भारताने देखील या भागातील आपले लष्करी बळ वाढविले आहे. दरम्यान चीनकडून मात्र सीमेचे उल्लंघन झाल्याची बाब फेटाळून लावण्यात आली आहे. 

या भागातील सीमारेषेबाबत उभय देशांत मतभेद आहेत. दोन्ही देशांनी परस्पर त्यांच्या सीमारेषांची आखणी केली असून याधीही चिनी सैन्याने याच भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पॅंगॉन्ग त्सो आणि गलवान खोऱयावर चीनचे पूर्वीपासून लक्ष असून या भागातील चिनी सैन्याचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. याच भागात चीनने मागील दोन आठवड्यांत शंभर तंबू ठोकले असून बंकरच्या उभारणीसाठी लागणारे साहित्य देखील या भागांत आणण्यात आले आहे. भारताने मात्र याला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मध्यंतरी या भागाला भेट दिली होती. 

सैन्य आमने सामने 

पाच मे रोजी याच भागांत उभय देशाचे सैन्य आमनेसामने आले होते. यावेळी दोन गटांत जोरदार बाचाबाची देखील झाली होती. याचे पर्यावसन पुढे हाणामारीत झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी उभय देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत चर्चा ही झाली होती. हा वाद निवळतो नाही तोच ९ मे रोजी उत्तर सिक्कीममध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर एकाच आठवड्यात दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाच बैठका पार पडल्या होत्या. यावेळी भारताची बाजू मांडताना लष्करी अधिकाऱ्यांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या घुसखोरीला आक्षेप घेतला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com