पाकिस्तान सरकारचे त्यांच्याच लष्करप्रमुखाने टोचले कान - pakistan army chief slams pakistan government on kashmir issue | Politics Marathi News - Sarkarnama

पाकिस्तान सरकारचे त्यांच्याच लष्करप्रमुखाने टोचले कान

वृत्तसंस्था
सोमवार, 25 मे 2020

काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी स्वतःच्या सरकारला सुनावले आहे. काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडण्यात भारताला यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

इस्लामाबाद : ‘काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरला असून भारताला मात्र आपली बाजू जगासमोर मांडण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे सध्या जागतिक संघटनांचे लक्ष काश्मीरमधील मानवाधिकांरांचे उल्लंघन आणि हिंसाचारासून दूर झाले आहे, ’ असे वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी केले आहे. त्यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळील पूना सेक्टरला भेट दिली. 

गेल्या काही दिवसात सीमेवर होणाऱ्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. काश्मीरमध्ये ३ मे रोजी झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्यदलाचे कर्नल आशुतोष यांच्यासह पाच जवान शहिद झाले होते. त्यानंतर भारताने कठोर पावले उचलली. मे महिन्यातच संरक्षण दलाच्या तीन मोठ्या चकमकी झाल्या आहेत. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या हवाई दलाने  सीमाभागात आपली गस्त वाढविली असल्याचेही सांगण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर सीमेरेषवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जनरल बाजवा यांनी या भागाचा दौरा केला. 

काश्मीरमध्ये १३ दिवसांत तीन मोठ्या घटना 

६ मे, पुलवामा : हिजबुल मुजाहिदिनचा एक कमांडर रियाज नायकू ठार. दोन वर्षांपासून तो ‘मोस्ट वाँटेड’ होता. 
१६ मे, डोडा : खोत्रा गावामध्ये भारतीय सैन्याने पाच तास चाललेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदिनच्या दहशतवाद्याला ठार केले. 
१९ मे, श्रीनगर : डाउनटाउन भागात भारतीय सैन्याने हिजबुल मुजाहिदिनच्या दोन अतिरेक्यांना ठार केले. त्यामध्ये तहरीक-ए-हुर्रियत या संघटनेच्या प्रमुखाचा मुलगा जुनैद सहराइ याचा समावेश होता. 

हे देखील वाचा : लक्षणे नसल्यास प्रवाशांचे क्वारंटाइन नाही 

काश्मीर हा विवादास्पद भाग आहे. भारताने या भागावर नेहमीच दावा केला आहे. स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनविले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी ३७० कलमही हटविले. ते नैतिक आणि संविधानिकदृष्ट्या योग्यच होते. काश्मिरी नागरिकांबरोबर आम्ही बंधुत्वाच्या नात्याने ईद साजरी करत आहोत. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत.
- जनरल कमर जावेद बाजवा, लष्करप्रमुख, पाकिस्तान 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख