सासूबाईंनी अंबाजोगाईला आरटीओ कार्यालय दिले; सुनेने इमारतीला मंजूरी मिळविली 

राज्यात मागच्या काही वर्षांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयांना मंजूरी मिळाल्यानंतर लोकनेत्या तत्कालिन मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्यामुळे अंबाजोगाईलाही आरटीओ कार्यालय मिळाले होते.
  Namita Mundada, Vimal Mundada, .jpg
Namita Mundada, Vimal Mundada, .jpg

अंबाजोगाई (जि. बीड) : अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या बांधकामास प्रशासकीय मंजूरी मिळविण्यात आमदार नमिता मुंदडा यांना यश आले आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीडच्या अगोदर अंबाजोगाईला आरटीओ कार्यालयाची इमारत असणार आहे. सासूबाईंनी कार्यालय मिळवून दिले तर सुनबाईमुळे आता अंबाजोगाईत आरटीओ कार्यालयाला हक्काची इमारत मिळणार आहे.

या कामासाठी ११ कोटी ३१ लाख रुपयांचची तरतुद झाली असून यातून सुसज्ज कार्यालयाच्या इमारतीसह, ट्रॅक, सोलार यंत्रणा होणार आहे. दिवंगत लोकनेत्या तत्कालिन मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्यामुळे १६ वर्षांपूर्वी म्हणजे २००४ मध्ये बीडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विभाजन होऊन जिल्ह्याच्या विभागीय परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाले. बीड कार्यालयाचा पासिंग क्रमांक एम. एच. २३ असून या कार्यालया अंतर्गत बीड, आष्टी, पाटोदा, शिरुर कासार, गेवराई तर अंबाजोगाई कार्यालयाअंतर्गत अंबाजोगाईचा क्रमांक एम. एच. ४४ असा असून या अंतर्गत अंबाजोगाईसह परळी, केज, धारुर, वडवणी व माजलगावचा समावेश आहे. मात्र, या दोन्ही कार्यालयांना मालकीच्या इमारती नाहीत. 

  Namita Mundada, Vimal Mundada, .jpg
BJP News : भाजपच्या बड्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा दुरावा

अंबाजोगाईच्या इमारतीसाठी आमदार नमिता मुंदडा यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून ११.३१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लोखंडी सावरगाव शिवारात दहा एकरांत आरटीओ कार्यालयाची सुसज्ज आणि अद्यावत इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे अंबाजोगाईसह परळी, माजलगाव, केज, धारूर आणि वडवणी या तालुक्यातील वाहनधारकांची मोठी सोय झाली. सुरुवातीला हे कार्यालय यशवंतराव चव्हाण चौकात भाडेतत्वावर खाजगी जागेत होते. त्यानंतर ते जोगाईवाडी शिवारात हलवण्यात आले. तर, जड वाहनांची तपासणी आणि चालक परवान्याच्या चाचण्या मात्र चार किमी अंतरावर लोखंडी सावरगाव परिसरातील ‌तकलादू ट्रॅकवर घेण्यात येतात. 

मुबलक जागेअभावी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनाही विविध कामांसाठी दोन-दोन ठिकाणी धावपळ करावी लागते. त्यामुळे अंबाजोगाई येथील कार्यालयासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज इमारत बांधण्यात यावी यासाठी नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी मागील एक वर्षापासून पाठपुरावा सुरु ठेवला होता. औरंगाबाद येथील उपमुख्य वास्तूविशारद यांच्याकडून बांधकामाचा नकाशा तयार करण्यात येऊन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून परिवहन विभागास पाठविण्यात आला. मुंदडांनी अधिकाऱ्यांडे  पाठपुरावा करत हा प्रस्ताव विविध पातळ्यांवर पुढे ढकलला. अखेर याला मुर्त रुप आले असून १ कोटी ३१ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

दरम्यान, नवीन आरटीओ कार्यालय दहा एकर जागेत उभारण्यात येणार आहे. त्यात दोन मजली मुख्य कार्यालयीन इमारतीसह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठीचे निवासस्थान असतील. मुख्य इमारत फर्निचर, सोलर पेनेल, अग्नी सुरक्षा उपकरणे, रेन हार्वेस्टिंग आदी सुविधांसह सुसज्ज असेल. दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळ असतील. सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी वाहन विषयक विविध चाचण्यांसाठी चार ‌अद्यावत ट्रॅक असणार आहेत.
 
बीडच्या आधी अंबाजोगाई कार्यालयाला मिळाली इमारत 

बीड आणि अंबाजोगाई येथील आरटीओ कार्यालये सुरु झाल्यापासून ते आजतागायत भाड्याच्या जागेत आहेत. परंतु, आता बीडच्याही आधी अंबाजोगाई कार्यालयाला स्वतःची इमारत मिळणार आहे.
 
दिवंगत मुंदडांमुळे अनेक कार्यालये
 
अंबाजोगाईला दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांच्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने अनेक कार्यालये मंजूर होऊन इमारतीही उभारण्यात आल्या. यात प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, भूसंपादन कार्यालय, स्त्री रुग्णालय, वृद्धत्व व मानसिक आजार केंद्र, परिचर्या प्रशिक्षण केंद्र आदी विविध कार्यालये मंजूर झाले.
 
Edited By - Amol Jaybhaye  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com