धनंजय मुंडेंना सल्ला देणारी फेसबुक पोस्ट जयसिंगराव गायकवाडांनी केली डिलीट 

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सोमवारीच खुद्द धनंजय मुंडे यांनी जिल्हावासियांनो सावधान, रुग्णसंख्या वाढतेय, कोरोनाविषयक नियमांचे पालन करा, असे आवाहन केले होते.
 Dhananjay Munde, Jaysingrao Gaikwad .jpg
Dhananjay Munde, Jaysingrao Gaikwad .jpg

बीड : जिल्हावासीयांनो सावधान! रुग्णसंख्या वाढतेय; कोरोनाविषयक नियमांचे पालन करा, असा जिल्हावासियांना पालकत्वाचा सल्ला देणाऱ्या धनंजय मुंडे स्वत:च मास्कविना फिरत असल्याचे माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी हेरले. त्यांनी लागलीच जेष्ठत्वाच्या नात्याने धनंजय मुंडे यांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला.

‘प्रिय धनंजयजी, कृपया मास्कचा वापर करा, विना मास्क आपले फोटो व्हायरल झाले आहेत.’ अशी फेसबुक पोस्ट करत त्याखाली मुंडे यांचे मास्कविनाचे फोटोही अपलोड केले होते. त्या नंतर काही वेळातच त्यांनी मुंडेंना सल्ला देणारी फेसबुक पोस्ट डिलीट केल्यामुळे वेगळीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. 

दरम्यान, आता कोरोनाची दुसरी लाट, नवा स्ट्रेन आल्याचे बोलल्या जात आहे. राज्यासह जिल्ह्यातही मागच्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या आकड्यांत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून सोमवारीच (ता. २२ फेब्रुवारी) धनंजय मुंडे यांनी जिल्हावासियांना काळजी घेण्याचे आवाहन केले. 

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कुठलीही कसर ठेवली नाही. स्वत: अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल ४९ कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला. आणखी काही कसर राहू नये म्हणून आपत्ती निवारण व गौण खनिज या विभागांतूनही दहा कोटी रुपयांची भर टाकून हा आकडा ५९ कोटींवर नेला.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावरील उपाय योजना प्रभावी व्हाव्यात यासाठी त्यांनी वाट्टेल ते केले. पण, यंत्रणांनी उपचार आणि उपाय योजनांपेक्षा रंगरंगोटी, दुरुस्त्या, अवाजवी किंमतीने वस्तूंच्या खरेद्या करत कोरोनाच्या नावाखाली निधीची उधळपट्टीच केल्याचे समोर आले आहे. भविष्यात कदाचित धनंजय मुंडे याकडे लक्ष देऊन अनियमिततेप्रकरणी चौकशी करतीलही. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com