जिल्हा परिषद आरक्षण सोडतीमुळे प्रस्थापितांना धक्का 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २३ मार्च) आरक्षण काढण्यात आले.
 Akola, Zilla Parishad .jpg
Akola, Zilla Parishad .jpg

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २३ मार्च) आरक्षण काढण्यात आले. महिला आरक्षणाने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी माजी सदस्यांना फटका बसला असून दोन सभापती सुद्धा विस्थापित झाले आहे. त्यासोबतच राजकीय पक्षांच्या काही प्रमुखांवरही नवे मतदारसंघ (सर्कल/गट) शोधण्याची वेळ आली आहे. 

जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या १४ जागांसाठी आरक्षणाची सोडत प्रक्रिया मंगळवारी (ता. २३ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी १४ पैकी ७ जागा महिलाांसाठी राखीव करण्यात आल्या. नव्या आरक्षणामुळे काही सत्ताधारी माजी सदस्यांना फटका बसला आहे तर काही सदस्यांचे मतदारसंघ 'जैसे थे'च असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

आपल्यासाठी सोयीचा असलेला मतदारसंघ महिलेसाठी राखीव झाल्यामुळे काही सदस्यांना आता पत्नीच्या आडून निवडणूक लढवावी लागेल. नव्या आरक्षणामुळे सर्वाधिक फटका सत्ताधारी माजी दोन सभापतींना बसला आहे. कुरणखेड येथून निवडून आलेल्या मनीषा बोर्डे यांचा मतदारसंघ आता सर्वसाधारणसाठी राखीव झाला आहे. तर कानशिवणी सर्कलमधून निवडणून आलेले चंद्रशेखर पांडे गुरूजी यांचा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला आहे. असे असले तरी संबंधितांसमोर आता दुसऱ्या मतदारसंघातून राजकीय कारकीर्द सुरू करण्याची संधी आहे.
 
नव्या आरक्षणामुळे असे बदलले मतदारसंघ

जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सर्कल असलेले तळेगाव, कुटासा, बपोरी, दगडपारवा, अडगाव, कानशिवणी व अंदुरा हे सर्कल महिलांसाठी राखीव झाले आहेत. उर्वरित सर्कल हे महिला आरक्षणातून सुटले आहेत. त्यामध्ये कुरणखेड, देगाव, शिर्ला, अकोलखेड, लाखपुरी, घुसर, दानापूरचा समावेश आहे.

यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुटासा सर्कल महिलांसाठी राखीव होते. तेथून भाजपच्या कोमल पेटे विजयी झाल्या होत्या. तळेगाव सर्कलही स्त्रीसाठी राखीव होते. येथून संगीता अढावू निवडून आल्या होत्या. दगडपारवाही राखीव झाले असून, यापूर्वी राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या सुमन गावंडे विजयी झाल्या होत्या. बपोरी सर्कलही महिलांसाठी राखीव झाले आहे. तेथून भाजपच्या माया कावरे विजयी झाल्या होत्या. अडगाव सर्कल महिला राखीव झाले असून, यापूर्वी वंचितच्या प्रमोदिनी कोल्हे विजयी झल्या होत्या.
 
यांना शोधावा लागणार पर्याय

माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम व शिक्षण समिती सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी यांचा कानशिवणी सर्कल; महिला व बाल कल्याण समिती सभापती मनीषा बोर्डे आणि संजय बावणे यांचा अंदुरा सर्कल महिलांसाठी राखीव झाला आहे. सदर तीनही माजी सदस्य सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणून आले होते. आता ते विस्थापित झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर इतर मतदारसंघ शोधण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु ते त्यांच्या मतदारसंघात कुटुंबातील व्यक्तीलाच संधी देता कि स्वतः दुसरा मतदारसंघ शोधतात याकडे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com