हिरेन प्रकरणावरुन 'एनआयए'ची 'एटीएस' विरोधात विशेष न्यायालयात कैफियत? - NIA May Approach Special Court against ATS for Mansukh Hiren Case Probe | Politics Marathi News - Sarkarnama

हिरेन प्रकरणावरुन 'एनआयए'ची 'एटीएस' विरोधात विशेष न्यायालयात कैफियत?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मार्च 2021

मनसुख हिरेन खुनाचा शोध निर्णायक टप्प्यावर आला असल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपवण्याची गरज काय असा प्रश्न दहशतवाद प्रतिबंधक दलाने केला आहे. तपास यंत्रणातील दोन वेगवेगळ्या संस्था समान विषयावर तपास करत असल्या तरी त्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यास संघर्षाचे आयाम येण्याची शक्यता निर्माण झाली आहे

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास 'एनआयए' (NIA)कडे सोपविण्याचा केंद्रीय गृहखात्याने आदेश देऊन तीन दिवस उलटूनही महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक (ATS)ने आपल्याकडे या प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे सोपवली नसल्याची माहिती एनआयएने विशेष न्यायालयाला दिली आहे. केंद्र व राज्याच्या या दोन तपास यंत्रणांमध्ये या प्रकरणावरून तूतू-मैंमैं सुरु असल्याचे यावरुन स्पष्ट होते आहे. (NIA May Approach Special Court against ATS for Mansukh Hiren Case Probe)

मनसुख हिरन खुनाचा शोध निर्णायक टप्प्यावर आला असल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपवण्याची गरज काय असा प्रश्न दहशतवाद प्रतिबंधक दलाने केला आहे. तपास यंत्रणातील दोन वेगवेगळ्या संस्था समान विषयावर तपास करत असल्या तरी त्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यास संघर्षाचे आयाम येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही यंत्रणा वेगवेगळ्या किंबहुना परस्परांच्या विरोधातील पक्षांच्या अखत्यारीत येत असल्याने येणार्या काही दिवसात तणाव निर्माण होण्याची चिन्हे 

सचिन वाझे यानेच मनसुख हिरण याची हत्या केल्याचे काल एटीएसप्रमुख जयजीतसिंग यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता यासंदर्भात एनआयएने चौकशी करण्याची गरज काय असा प्रश्न केला जातो आहे. वाझेचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी एटीएसने आता एनआयए न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे. (NIA May Approach Special Court against ATS for Mansukh Hiren Case Probe)

दरम्यान, न्यायालयात हे प्रकरण गेल्यास त्याचा निकाल एनआयएच्या बाजूने लागू शकतो, असे या विषयातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेण्यासाठी 'एनआयए'ला कायद्याचा आधार आहे. एनआयए कायद्यानुसार (The National Security Agency Act,2008)च्या कलम ८ मध्ये याबाबत तरतूद आहे. जर एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणाशी संलग्न प्रकरणे असतील तर त्यांचा तपास एनआयए करु शकते, असे या कलमात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख