स्‍थायी समितीच्या दहा सदस्यांनी एकाच दिवशी दिले राजीनामे

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीआखण्यास सुरुवात केली आहे.
Ten members of the Standing Committee resigned on the same day in Thane
Ten members of the Standing Committee resigned on the same day in Thane

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमधील शिवसेनच्या सहा, भारतीय जनता पक्षाच्या तीन तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक अशा दहा सदस्यांनी आपला ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यामुळे सोमवारी (ता. ६ सप्टेंबर) सदस्यपदाचा राजीनामा महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर पिठासीन अधिकारी महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांचे राजीमाने मंजूर करीत त्यांच्या जागी नवीन दहा सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. (Ten members of the Standing Committee resigned on the same day in  Thane )

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी देखील आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारी झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के, नरेश मणेरा, राम रेपाळे, विमल भोईर, मालती पाटील आणि गुरमुखसिंग स्यान यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पाटील, नम्रता कोळी आणि भरत चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे शानू पठाण यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. 

दरम्यान, आगामी निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने व्यूव्हरचना आखत नगरसेवकांना संधी दिली आहे. यामध्ये शिवसेनेच्या वतीने सुधीर कोकाटे, उमेश पाटील, संतोष वडवले, मिनल संख्ये, अनिता गौरी आणि मधुकर पावशे यांना नियुक्त केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिलिंद पाटणकर, सुनेश जोशी आणि अर्चना मणोरा यांना, तर राष्ट्रवादीकडून सुहास देसाई यांना स्थायी समितीमध्ये संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा : कोस्टल रोडच्या एक हजार कोटींच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी? 

मुंबई  ः कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०२० याकाळात सुमारे १ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेनेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय? असा सवाल करत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संपूर्ण प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी आज (ता. ६ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत केली आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, याची तातडीने दखल घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आमदार आशिष शेलार यांनी यांसदर्भात आज वांद्रे पश्चिम येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात वरील आरोप केले. शेलार म्हणाले की, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने जे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले, त्यातील अत्यंत महत्त्वाच्या कोस्टल रोड प्रकल्पाला आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची किड लागल्याचे आता उघड होते आहे. यामुळे मुंबईकरांना मेट्रोप्रमाणे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे, हे दुर्दैवी. ह्या प्रकल्पात अंदाजे १ हजार कोटी व अधिकचा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. भाजपची टीम यावर लक्ष ठेवून आहे, यामध्ये काही मोठे लागेबांधे असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी तातडीने एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार आशिष शेलार यांनी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दिले आहे. 

हा संपूर्ण घोटाळा स्थायी समितीच्या सहमतीने झाला आहे का? जेव्हा मुंबईकर कोरोनकाळात घरात बंद होते, तेव्हा शिवसेनेचे हे घोटाळे सुरु होते का? याची कंत्राटे कोणाला दिली, हे सगळे आम्ही उघड करू. मात्र, त्याआधी या सगळ्याची उत्तरे सताधारी म्हणून शिवसेनाला द्यावी लागतील; अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाने ही लढाई लढू, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com