शिवसेना मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मनसेची राज्यपालांकडे तक्रार...

''पोलिसांनी केवळ अनिल परब यांच्या म्हणण्यावरून आपल्यावर कारवाई केली'', असा अखिल चित्रे यांचा आरोप आहे.
raj25.jpg
raj25.jpg

मुंबई: "शिवसेनेचे मंत्री अनिल परब गृह विभागाच्या कारभारात ढवळाढवळ करीत असून गृह विभागाचा गैरवापर करून मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला लावत आहेत," असा आरोप महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने राज्यपालांकडे केला आहे. याबाबत मनसेचे वांद्रे पूर्व परिसरातील पदाधिकारी अखिल चित्रे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. अखिल चित्रे यांनी अनिल परब यांच्यावर कारवाईची मागणी राज्यपालांकडे केली आहे. 

अनिल परब हे परिवहन खात्याचे मंत्री असले तरीही ते आपल्या पदाचा गैरवापर करत गृह खात्यात ढवळाढवळ करीत आहेत आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना खोट्या केसेसमध्ये फसवून गुन्हे दाखल करत आहेत, असे अखिल चित्रे यांनी पत्रात म्हटलं आहे. ''जानेवारी महिन्यातच अनिल परब यांनी बांद्रा पूर्व येथील एका प्रकरणात अखिल चित्रे हे घटनास्थळी उपस्थित नसतानाही ते घटनास्थळी होते, असं दाखवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावला. अखिल चित्रे यांना या प्रकरणात काही दिवस तुरुंगात राहावे लागले. आपण घटनास्थळी उपस्थित नसतानाही पोलिसांनी केवळ अनिल परब यांच्या म्हणण्यावरून आपल्यावर कारवाई केली'', असा अखिल चित्रे यांचा आरोप आहे.

चंद्रपूरचे स्थानिक डीसीपी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी अखिल चित्रे यांनी केली आहे. भाजपचे एक शिष्टमंडळ ज्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा मुंबईचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांचा समावेश होता. 

नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करताना अडचणी निर्माण होत आहे. म्हणूनच सर्वांच्याच मनाला धीर मिळावा, यासाठी राज्यपालांनी संपूर्ण माहिती घेऊन या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी बोलतं करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com