सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट... - politics ncp mp Supriya Sule meets Sonia Gandhi  | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

सुप्रिया सुळे यांनी कॅाग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुळे यांची ही भेट कशासाठी होती, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. 

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बाँम्बनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये बैठका सुरू आहे. विरोधपक्ष भाजपने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कॅाग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुळे यांची ही भेट कशासाठी होती, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. 

सोनिया गांधी यांच्या भेटीबाबत सुळे यांनी टि्वट केले आहे. आपल्या टि्वटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, "तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभारी आहे." 
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे म्हणाले की, आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढणे गरजेचे आहे. तर काल रात्री उशिरा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना टि्वट करीत परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चैाकशी करावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.  परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली आहे.   

हेही वाचा : मोदींनी लोकशाही, स्वातंत्र्यांचा गळा घोटला...शिवसेनेचे टीकास्त्र
 
मुंबई : मोदी सरकारने लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे ठरवूनच टाकले आहे. जेथे जेथे भाजपची सत्ता नाही तेथे तेथे राज्यपालांच्या माध्यमातून त्या राज्यातील सरकारच्या नाडय़ा आवळायच्याच असे एक धोरण मोदी सरकारने ठरवूनच टाकले आहे, अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून आज भाजपवर करण्यात आली आहे. राज्यपाल हेच सरकार चालवतील असे नवे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयक म्हणत असेल तर मग दिल्लीची विधानसभा आणि मुख्यमंत्री हवेतच कशाला? केजरीवाल यांच्या जागी भाजपचे मुख्यमंत्री असते तर हे असले विधेयक मोदी सरकारने आणलेच नसते. पण महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता गाजवू इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच त्यांचे धोरण आहे. दिल्ली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांचा कचरा करून केंद्र सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे. देशासाठी हे घातक आहे, असे भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख