बीडची जागा शिवसेनेलाच; उमेदवारी क्षीरसागरांना

युतीत शिवसेनेच्या हक्काची असलेली बीडची जागा शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट झाले असून राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित झाली. सोमवारी (ता. ३०) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना एबी फांर्म दिला.
Jaydatta Kshirsagar Gets AB Form from Uddhav Thakre
Jaydatta Kshirsagar Gets AB Form from Uddhav Thakre

बीड : युतीत शिवसेनेच्या हक्काची असलेली बीडची जागा शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट झाले असून राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित झाली. सोमवारी (ता. ३०) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना एबी फांर्म दिला.

लोकसभा निवडणुकी दरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना रोहयो आणि फलोत्पादान खात्याचे मंत्रीपद मिळाले. दरम्यान, युतीत बीडची जागा शिवसेनेची आहे. परंतु, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांच्याकडून या जागेची मागणी होत होती. क्षीरसागर व मेटे दोघेही बीडमधून दावेदार असल्याने कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. 

अखेर सोमवारी ही जागा युतीत शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना अधिकृत उमेदवारीचा ‘एबी’ फॉर्म दिला. त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com