नाशिकचे शिवसैनिक नगरसेवक दिलीप दातीर आज झाले मनसैनिक

शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ते नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दातीर यांच्या मनसे प्रवेशामुळे या मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे तयार होऊन भाजपला आव्हान मिळाले आहे.
Nashik Shivsena Corporator Dilip Datir in MNS
Nashik Shivsena Corporator Dilip Datir in MNS

नाशिक :  शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ते नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दातीर यांच्या मनसे प्रवेशामुळे या मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे तयार होऊन भाजपला आव्हान मिळाले आहे.

नगरसेवक दातीर हा शहरातील चर्चीत चेहरा आहे. अंबड लिंक रोडवरील अनधिकृत भंगार बाजार तसेच तेथील अनधिकृत व्यवसायांविरोधात त्यांनी दहा वर्षे एकाकी लढा दिला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा लावून धऱला. त्याच वेळी महापालिका तसेच रस्त्यावर देखील आंदोलनन केले. त्यामुळे हा भंगार बाजार हलवावा लागला. त्यामुळे सातपूर, अंबड तसेच लिंक रोड वरील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यामुळे त्यांना शहरात मोठा पाठींबा मिळाला होता. अशा स्थितीत ते विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे शिवसेना तसेच भाजपचा पारंपरिक मतदार त्यांच्याकडे वळण्याची भिती आहे. 

हे देखिल वाचा-

सध्या नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपमधील पंधरा इच्छुकांनी उमेदवारी मागीतली आहे. यामध्ये माजी सभागृह नेते दिनकर पाटील, प्रदिप पेशकार यांसह सहा ते सात इच्छुक गंभीर होते. त्यांनी प्रचारही सुरु केला होता. उमेदवारी न मिळाल्यास ते नाराज होतील. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, विलास शिंदे हे दोन्ही नगरसेवक व पाच अन्य उमेदवार होते. हे सर्व इच्छुक वेगळीच भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्याची अगदी उघड चर्चा आहे. त्यामुळे युतीचा उमेदवार असला तरी प्रचाराच युतीत किती एकोपा दिसेल या विषयी शंकाच आहे. ही नवी समीकरणे शिवसेना- भाजप युतीच्या उमेदवाराला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com