किशनचंद तनवाणींनी भाजप नगरसेवक फोडून दाखवावेत - संजय केणेकर

शिवसेनेत प्रवेश केलेले दामूअण्णा शिंदे व त्यांच्या पत्नी नगरसेविका सत्यभामा शिंदे हे भाजपचे नसून अपक्ष निवडूण आले होते. जनार्दन कांबळे हे देखील अपक्षच आहेत. भाजपशी त्यांचा कुठलाही संबंध नाही, त्यामुळे शिवसेनेत भाजपचे नगरसेवक गेले असे म्हणणे योग्य नाही. किशनचंद तनवाणी यांनी भाजपचे नगरसेवक फोडून दाखवावेत.- भाजचे शहराध्यक्ष संजय केणेकर
किशनचंद तनवाणी यांनी भाजपचे नगरसेवक फोडून दाखवावेत असे आव्हानच भाजचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिले आहे.
किशनचंद तनवाणी यांनी भाजपचे नगरसेवक फोडून दाखवावेत असे आव्हानच भाजचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिले आहे.

औरंगाबादः शिवसेनेत प्रवेश केलेले दामूअण्णा शिंदे व त्यांच्या पत्नी नगरसेविका सत्यभामा शिंदे हे भाजपचे नसून अपक्ष निवडूण आले होते. जनार्दन कांबळे हे देखील अपक्षच आहेत. भाजपशी त्यांचा कुठलाही संबंध नाही, त्यामुळे शिवसेनेत भाजपचे नगरसेवक गेले असे म्हणणे योग्य नाही. किशनचंद तनवाणी यांनी भाजपचे नगरसेवक फोडून दाखवावेत असे आव्हानच भाजचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिले आहे.

महापालिकेत गेली पाच वर्ष भाजपच्या गटात राहिलेल्या अपक्ष नगरसेविका सत्यभामा शिंदे व त्यांचे पती माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. किशनचंद तनवाणी स्वगृही परतल्यानंतर त्यांनीच शिंदे यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न केले.

त्यात यश आल्यानंतर नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिंदे पती पत्नीला शिवबंधन बांधण्यात आले. तर आज कांचनावाडी वार्डाच्या अपक्ष नगरसेविका विमल कांबळे व त्यांचे पती जनार्दन कांबळे यांनी देखील शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही प्रवेशामागे किशनचंद तनवाणी असल्याचे बोलले जाते.

भाजपने मात्र दामूअण्णा शिंदे व त्यांच्या पत्नी सत्यभामा शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे भाजपला धक्का हे मानण्‍यास नकार दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, राज्यात आणि महापालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर अनेक अपक्ष नगरसेवकांनी राज्य सरकारने महापालिकेला दिलेल्या निधीचा वापर करून घेतला, ते मोठे झाले. आता निवडणुकीच्या तोंडावर ते नवा घरोबा शोधत आहेत. पण भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडून शिवसेनेत किंवा अन्य पक्षात गेलेला नाही हे आवर्जून सांगावेसे वाटते.

किशनचंद तनवाणी भाजप सोडून शिवसेनेत गेले तेव्हा भाजपला मोठा हादरा बसेल, अनेक नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्यासोबत जातील असे चित्र रंगवण्यात आले होते. पण भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी पक्षाशी एकनिष्ठ आहेत, ते कुठेही जाणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे अपक्षांना पक्षात प्रेवश देऊन भाजपला हादरा दिल्याचे भासवणाऱ्या तनवाणी यांनी भाजपचा एक नगरसेवक फोडून दाखवावा असे आव्हानच केणेकर यांनी सरकारनामाशी बोलतांना दिले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com