कोरोनाच्या जनजागृतीत खासदार संजय जाधव हेही अग्रेसर

राज्यभरात कोरोना विषाणूनचा संसर्ग वाढल्याने सर्वच पातळीवर जनजागृती केली जात आहे. यात परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील मागे नाहीत. त्यांनी संपूर्ण मतदार संघात सोशल मिडियाव्दारे कोरोना संदर्भात काय खबरदारी घ्यावी या संदर्भात स्टिकर द्वारे जनजागृती सुरु केली आहे.
राज्यभरात कोरोना विषाणूनचा संसर्ग वाढल्याने सर्वच पातळीवर जनजागृती केली जात   आहे. यात परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील मागे नाहीत.
राज्यभरात कोरोना विषाणूनचा संसर्ग वाढल्याने सर्वच पातळीवर जनजागृती केली जात आहे. यात परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील मागे नाहीत.

परभणी ः राज्यभरात कोरोना विषाणूनचा संसर्ग वाढल्याने सर्वच पातळीवर जनजागृती केली जात आहे. यात परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील मागे नाहीत. त्यांनी संपूर्ण मतदार संघात सोशल मिडियाव्दारे कोरोना संदर्भात काय खबरदारी घ्यावी या संदर्भात स्टिकर द्वारे जनजागृती सुरु केली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यभरात वाढत जात असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यशासनाने देखील या संदर्भात कठोर पावले उचलली असून राज्यातील शाळा, महाविद्यालय,
चित्रपटगृह, मॉल, व्यायामशाळा व गर्दीचे ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत.

परभणी जिल्ह्यातही राज्य शासनाच्या आदेशीचा अत्यंत कडक अमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत असून राजकारणातील लोकही या पासून दुर राहिले नाहीत. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी देखील मतदार संघातील नागरीकांसाठी कोरोना जनजागृती सुरु केली आहे.

खासदार संजय जाधव यांनी सोशल मिडियावर त्यांनी तयार केलेले स्टिकर फिरविण्यास सुरुवात केली आहे. या स्टिकरवर कोरोना विषाणू बाबत उपयुक्त अशी सर्वसाधारण माहिती देण्यात आली आहे. यात कोरोना विषाणू आजाराची सर्वसाधारण लक्षणे व प्रतिबंधात्मक खबरदारी देण्यात आली आहे. खासदार संजय जाधव यांच्या या स्टिकरची संपूर्ण मतदार संघात चर्चा होती. जिल्ह्यातील मोठ्या नेत्याने जनजागृती सुरु केल्याने सहाजिकच त्यांचे कार्यकर्ते ही यात मागे राहिले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com