नमिता मुंदडा यांचा उमेदवारी अर्ज भरायला संगीता ठोंबरेही हजर 

नमिता मुंदडा यांनी फेरी काढून खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासोबत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप आमदार संगीता ठोंबरेही सोबत होत्या हे विशेष. नंतर नमिता मुंदडाही संगीता ठोंबरे यांच्या घरी गेल्या.
Mundada-Thombre
Mundada-Thombre

केज : नमिता मुंदडा यांनी शुक्रवारी भव्य फेरी काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेश खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासह आमदार संगीता ठोंबरे ह्या होत्या हे विशेष. त्यानंतर नमिता मुंदडांनी खासदार मुंडेंसोबत आमदार ठोंबरेंच्या घरीही भेट दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसकडून केजमधून सर्वात अगोदर उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांच्या ऐवजी नमिता मुंदडा यांना उमेदवारी मिळाली. 


श्रीमती ठोंबरे यांनीही कुठलीही नाराजी व्यक्त न करता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा आदेश आपल्यासाठी अंतिम असल्याचे पुर्वीच जाहीर केले होते. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार प्रितम मुंडे यांच्यासोबत आमदार संगीता ठोंबरेही होत्या.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com