Munde-Thombre
Munde-Thombre

पंकजा मुंडेंच्या आदेशाचा सन्मान : संगीता ठोंबरे  

पंकजा मुंडे यांना काही अडचणीमुळे हा कटू निर्णय घ्यावा लागला असेल असेही आमदार संगीता ठोंबरे म्हणाल्या.

केज : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातच मतदार संघात विकास कामे करता आली. सर्वसामान्य जनता आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेहमी विकासाला साथ दिली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या आदेशाचा सन्मान असल्याचे भाजप आमदार संगीता ठोंबरे म्हणाल्या.

राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांनी सोमवारी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना केज मतदार संघातून भाजपची उमेदवारी निश्चित झाली.

त्यामुळे भाजपच्या ठोंबरे समर्थकांमधून नाराजी व्यक्त होत होती. नाराजांची बैठक घेऊन सोमवारी सायंकाळी त्यांनी मार्गदर्शन केले.

श्रीमती ठोंबरे म्हणाल्या, केज मतदार संघातील सामान्य जनता आणि भाजप कार्यकर्त्यांनी नेहमी आपल्याला पाठबळ आणि प्रेम दिले. भविष्यातही या मंडळींची कामे पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून केली जातील. तसा शब्द त्यांनी दिला आहे.

त्यांच्याकडून आपल्याला भविष्यात चांगली संधी मिळेल असेही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडेंना अडचणींमुळे आपल्याबाबत हा कटू निर्णय घ्यावा लागला असू शकतो त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा आपल्याला सन्मान असून कार्यकर्त्यांनीही या निर्णयाचा आदर करावा, असेही आमदार संगीता ठोंबरे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com