राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष उस्मानाबादेत पक्षाला जुने वैभव मिळवून देतील का?

डॉ.पद्मसिंह पाटील आणि आता आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतांना दुधगांवकर दिसले.
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष उस्मानाबादेत पक्षाला जुने वैभव मिळवून देतील का?
Osmanabad Ncp Political News

उस्मानाबाद ः जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.  डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या घराण्या विरोधात संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणुन दुधगावकर यांच्याकडे पाहिले जाते. (Will the newly elected NCP working president give the party old glory in Osmanabad) सतत पक्ष बदलण्याच्या त्यांच्या भुमिकेमुळे ते मधल्या काळात राजकीय पटलावर काहीसे बेदखल झाल्याचे  चित्र  होते. आता मिळालेल्या जबाबदारीने ते पुन्हा राजकारणात सक्रीय होतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

१९९५ युतीच्या काळात अर्जुन खोतकर जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना दुधगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. (Ncp Osmanabad District) दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-काॅंग्रेसने छुपी युती केली आणि अंबेजवळगा गट काॅंग्रेसकडे असल्याने नेत्यांच्या समन्वयातून दुधगावर लढले आणि  विजयही झाले. (Ncp Leader Jayant Patil, State President,Maharashtra)  तेव्हा त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देऊ केले, पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

कळंब- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांना यश आले नाही. मग पुन्हा २०१७ मध्ये त्यानी मोहा गटातुन जिल्हा परिषदेची निवडणुक लढविली, पण नशिबाने दुधगावकर यांना पु्हा दगा दिला आणि त्यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे ते भाजपमध्येही फार काळ टिकले नाही, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण जेमतेम वर्षभरात पुन्हा ते बाहेर पडले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सहा महिने होत नाही तो पुन्हा राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि पुन्हा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी संजय निंबाळकर यांच्या प्रचाराची मुख्य धुरा त्यानी सांभाळली होती, तेव्हापासुन ते राष्ट्रवादीमध्ये आहेत. पण संघटनात्मक पातळीवर ते जास्त सक्रीय दिसले नव्हते. मात्र आता पक्षाने त्यांच्यावर जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.

डॉ.पद्मसिंह पाटील आणि आता आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतांना दुधगांवकर दिसले. लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य करुन त्यानी पाटील घराण्याबरोबरच राजेनिंबाळकर यांच्याही विरोधात रान उठवले होते. राष्ट्रवादीला सध्या गटबाजीची लागण झाल्याने दुधगावकर पक्षवाढीसाठी कोणती रणनीती आखतात यावर पक्षाला जिल्ह्यात पुन्हा जुने दिवस येतील का? हे अवलंबून आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.