गडकरी असं म्हणूच शकत नाही; इम्तियाज जलील खोटारडे..

नितीन गडकरी आणि माझे राजकीय संबंध हे गेल्या कित्येक वर्षांचे आहे.
Shivsena Leader Chandrakant Khaire Reaction News
Shivsena Leader Chandrakant Khaire Reaction News

औरंगाबाद ः मी या जिल्ह्याचा वीस वर्ष खासदार होतो, मला व्हिजन नसते तर लोकांनी निवडून दिले असते का? मुळात नितीन गडकरी माझ्याबद्दल असं बोलूच शकतं नाही, इ्म्तियाज जलील खोटारडे आहेत, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. (Gadkari cannot say that; Imtiaz Jalil liar) या आधीच्या लोकप्रतिनिधींना व्हिजनच नव्हते, असं नितीन गडकरी म्हणाल्याचा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेत केला होता.

शहरात एकच अखंड पुल उभारण्याची मागणी करण्यासाठी इम्तियाज जलील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली होती. (Shivsena Leader Chandrakant Khaire)यावेळी झालेल्या चर्चेत गडकरी यांनी या आधीच्या लोकप्रतिनिधींना विकासाचे व्हिजनच नव्हते, त्यांनी कधी माझ्याकडे शहरासाठी अखंड लांब अशा पुलाची मागणीच केली नव्हती, असे सांगितल्याचे इम्तियाज म्हणाले होते.

यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार करत गडकरी असं म्हणूच शकत नाहीत, इम्तियाज जलील खोटं बोलत असल्याची टीका केली आहे. (AIMIM Mp Imtiaz Jalil, Aurangabad) चिकलठाणा विमानतळासमोर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुला विरोध करत त्याऐवजी आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात तो उभारण्यात यावा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती.

या संदर्भात त्यांनी नितीन गडकरी यांना पत्र पाठवून विमानतळासमोरील पुलाचे काम थांबवण्याची विनंती करत शहरातील इतर पक्षीय लोकप्रतिनिधींना देखील आवाहन केले होते. त्यानंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या आमदारांनी देशील विमानतळाऐवजी आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात उड्डाणपूल उभारण्या बाबत गडकरी यांना पत्र पाठवले होते.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे इम्तियाज जलील यांनी गडकरी यांच्याकडे पुन्हा ही मागणी करतांनाच पुणे, नाशिक, नगर,नागपूर प्रमाणे औरंगाबादला देखील एकच अखंड उड्डाणपूल का देत नाही? आमच्यावर अन्याय का करता? अशी तक्रार केली होती.  त्यांनतर यावर महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन गडकरी यांनी इम्तियाज जलील यांना दिले. ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी इम्तियाज यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा नितीन गडकरी असे म्हणाले, असा दावा करत खैरे यांच्यावर निशाणा साधला होता.

अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले..

या संदर्भात ई-सकाळला दिलेल्या मुलाखतीतील प्रश्नाला उत्तर देतांना खैरे यांनी इम्तियाज यांचा दावा फेटाळून लावत त्यांना खोटारडे ठरवले. खैरे म्हणाले, नितीन गडकरी आणि माझे राजकीय संबंध हे गेल्या कित्येक वर्षांचे आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि रस्त्यांचे प्रस्तावासाठी त्यांनी मला सहकार्य केले होते. राज्यात युतीचे सरकार असतांना आम्ही दोघांनी  एकत्र काम केले आहे. त्यामुळे या आधीच्या तुमच्या लोकप्रतिनिधींना व्हिजनच नव्हते, असं गडकरी कधीच बोलू शकत नाहीत.

इम्तियाज जलील हे खोटं बोलत आहेत. उलट गडकरी साहेबच मला अनेकदा तुम्हीच खासदार पाहिजे होतात, इम्तियाज जलील यांचा चेहरा मला पहावासा वाटत नाही, असे म्हटल्याचा दावा केला आहे. खैरे- इम्तियाज यांच्या दाव्या प्रतिदाव्यात किती तथ्य आहे हे गडकरीच सांगू शकतील. यावरून खैरे- इम्तियाज यांच्यात मात्र शाब्दीक युद्ध सुरू झाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com