वीज वितरण कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे येऊन बसतात तेव्हा...

शेतकऱ्यांना आर्थिकखाईत लोटण्याचे काम महावितरण करत असल्याची प्रतिक्रिया कोल्हे यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
वीज वितरण कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे येऊन बसतात तेव्हा...
Snehalata kolhe.jpg

कोपरगाव : वीज बिले भरूनही शेतकऱ्यांना मागणी करून वीज रोहित्रे दिले जात नसल्याने भाजप प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी वीज वितरण कार्यालयात जावून अधिकाऱ्यांना जाब विचारून ठिय्या मांडला. कोल्हे अचानक आल्याने अधिकाऱ्यांचीही धांदल उडाली. (When former MLA Snehalta Kolhe comes and sits in the power distribution office ...)

शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटण्याचे काम महावितरण करत असल्याची प्रतिक्रिया कोल्हे यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

येथील महाराप्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाउन कोल्हे यांनी सहायक अभियंता दिनेश चावडा यांना मतदार संघातील विदयुत रोहित्राअभावी होत असलेल्या नुकसानी संदर्भात धारेवर धरले. या वेळी विविध गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

कोल्हे म्हणाल्या की, वीजेचा खेळखंडोबा सुरू असून, शेतकरयांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. सध्या पावसाने ओढ दिली असून, विहीरीच्या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्यांसह इतर पिकांची लागवड केली आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली, परंतु महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे हाती आलेली पिके वाया जात आहे. वीजबीले भरूनही विदयुत रोहित्र बसविण्यास टाळटाळ केली जात आहे. रोहित्र वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोपही कोल्हे यांनी केला.

ब्राम्हणगाव येथील रोहित्र गेल्या एक महिन्यापासून जळालेली आहे. वारंवार मागणी करूनही दुरूस्ती केली जात नाही. ही अन्यायकारक भुमिका आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. रोहितराबाबत शेतकऱ्यांना न्याय दयावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोल्हे यांनी दिला.

राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्यासह अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विदयुत पुरवठा तातडीने सुरळीत करून नादुरूस्त विदयुत रोहित्र तातडीने बसवून देण्याची मागणीही कोल्हे यांनी यावेळी केली.

हेही वाचा..

अजितदादांनी उद्घाटन केलेल्या पुलाचे काम रखडले

अकोले : निळवंडे धरणाचे आदर्श पुनर्वसन या योजनेखाली निळवंडे धरण्याच्या मागील बाजूस पिंपरकणे येथे ३० कोटी ७० लाख रुपये खर्चून केल्याने या पुलाच्या भूमिपूजनानंतर निळवंडे धरण पूर्ण होण्यापूर्वी हा पूल करण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री जा अजित पवार यांनी दिले होते. मात्र, या पुलाचे काम रखडले त्यातच आता धरणाचे काम पूर्ण होऊन त्यात पाणी साठविण्यात आल्याने राजूर गावाशी असणारा १५ गावांचा संपर्क तुटला आहे. हा संपर्क सुरळीत राहावा यासाठी हा पूल होणे आवश्यक आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in