शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीवरून राडा; निषेध करणाऱ्या शहरप्रमुखाला चाबकाने फोडले..

नव्या निवडीवरून शिवसैनिकांमध्ये असलेल्या नाराजीचा स्फोट आज माजलगामध्ये झालाच. नव्या जिल्हाप्रमुखांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रॅलीतच तुफान राडा झाला.
Beed Shivsena Political news
Beed Shivsena Political news

माजलगाव ः जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीचा निषेध केल्याच्या कारणावरून नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शिवसेनेचे शहरप्रमुख धनंजय उर्फ पापा सोळंके यांना मारहाण केली. (Shiv Sena district chief over protest) दहा, पंधरा कार्यकर्त्यांनी बेल्ट, काठीने मारहाण केल्यामुळे सोळंके गंभीर जखमी झाले असून या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

शिवसेनेने मराठवाड्यातील लातूर आणि बीड या दोन जिल्ह्यात दोन दिवसांपुर्वी संघटनात्मक बदल केले होते. (Beed shivsena District Chief) बीड जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बदलण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये खदखद होती. जिल्हाप्रमुख बदल कुणाच्या भल्यासाठी केला, असा सवाल करत काही पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील दिला होता.

नव्या निवडीवरून शिवसैनिकांमध्ये असलेल्या नाराजीचा स्फोट आज माजलगामध्ये झालाच. नव्या जिल्हाप्रमुखांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रॅलीतच तुफान राडा झाला. जिल्हाप्रमुखाच्या निवडीचा निषेध तो देखील त्यांच्या तोंडावर काळे वंगण टाकून करणाऱ्या शहरप्रमुखाला बेदम मारहाण करण्यात आली. विरोधक आणि समर्थक दोघेही भिडल्यामुळे माजलगावमध्ये तुफान राडा झाला.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बीड जिल्हा जिल्हाप्रमुख पदाची खांदेपालट करून माजलगावचे तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली होती. हि निवड चुकीची असून सच्चा शिवसैनिकाला डावलून केल्याचे शहरप्रमुख धनंजय उर्फ पापा सोळंके यांचे म्हणणे होते. या चुकीच्या निवडीचा निषेध म्हणून पापा सोळंके यांनी दोन दिवसांपूर्वी चौकात उभा राहून बॅनर झळकवले होते.

गुरुवारी (ता. २४) शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव दुपारी शहरात झाले. जिल्हाप्रमुख पदावर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जाधव शहरात येत असल्याने त्यांच्या समर्थकांनी रॅली काढली.  केसापुरी कॅम्प पासून निघालेल्या या रॅलीत पापा सोळंके पुन्हा निषेध व्यक्त करण्यासाठी समोर आले. त्यांनी जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर काळे वंगण टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे अप्पासाहेब जाधव यांच्या समर्थकांनी पापा सोळंके यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

पट्टा आणि काठीने मारले..

दहा ते पंधरा समर्थकांनी पापा सोळंके यांना रस्त्यावर पाडून बेल्ट, काठीने मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पापा सोळंके यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. सेनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून नवीनच पक्षात आलेल्या सैनिकाला संधी दिली. ही निवड चुकीची म्हणत पापा सोळंके यांनी निवडीच्या दिवशीच शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी अप्पासाहेब जाधव यांचा फोटो हातात धरून निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com