नवनिर्वाचित प्रदेश चिटणीसांपुढे पक्षातील गटबाजी संपवण्याचे आव्हान..

प्रदेश चिटणीस पदी त्यांची नियुक्ती करत तसे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने त्यांना देण्यात आले.
नवनिर्वाचित प्रदेश चिटणीसांपुढे पक्षातील गटबाजी संपवण्याचे आव्हान..
Ncp state President Jayant Patil -Secretery Suresh Patil News Osmanabad

उस्मानाबाद ः कसबे तडवळे येथील एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यपातळीवर पक्षकार्य करण्याची संधी दिली आहे.  गुरुवारी (ता २६)  त्यांची प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली. (Newly elected state secretary Patil faces challenge to end factionalism in the party.) गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी पक्षाने उमेदवारी डावलल्यामुळे ते नाराज होते.  दिड वर्षापासुन ते पक्ष कार्यात कुठेही सक्रीय नव्हते.

दरम्यान, जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात परीवार संवाद यात्रा झाली. त्यावेळी सुरेश पाटील यांची नाराजी त्यांच्या कानावर घालण्यात आली होती. (Ncp State President Jayant Patil) जयंत पाटील २२ जुनला उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर माजी आमदार राहुल मोटे यांच्या गिरवली येथिल निवासस्थानी प्रदेशाध्यक्षा समवेत त्यांची बैठक देखील झाली होती. ( Ncp State Secretery Suresh Patil, Osmanabad) या बैठकीत पक्ष तुम्हाला महत्वाची जबाबदारी देणार आहे, असा शब्द जयंत पाटलांनी दिला होता.

तेंव्हापासुन सुरेश पाटील पुन्हा पक्षामध्ये सक्रीय झाले होते.  त्यांनी एस.पी.शुगर कारखान्यावर जिल्हाचे संपर्कमंञी तथा पाणीपुरवठा राज्यमंञी संजय बनसोडे  यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेत कार्यकर्त्यांची मोट पुन्हा बांधली होती.

तेव्हा पासुन पक्षश्रेष्ठी सुरेश पाटील यांना कुठली जबाबादारी देतात याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती. गुरुवारी मुबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षकार्यालयात उपमुख्यमंञी आजित पवार यांच्याबरोबर सुरेश पाटील यांची बैठक झाली व बैठकीमध्ये सुरेश पाटील यांना राज्यपातळीवर पक्षकार्य करण्याची संधी देण्याचा  निर्णय झाला.  

आगामी निवडणुकीत यश मिळवून द्या..

प्रदेश चिटणीस पदी त्यांची नियुक्ती करत तसे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने त्यांना देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले वेगवेगळे गट एकञ करुन गटबाजी संपवावी व सर्वान सोबत घेऊन आगामी नगरपालीका जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा परीषद निवडणुकीत पक्षाला आपल्या नियुक्तीच्या माध्यमातुन चांगले यश मिळवुन द्यावे, असे सांगितले.

सुरेश पाटील यांना राजकारणाचा चाळीस वर्षाचा अनुभव आहे. शिवाय ते सोलापुर जनता बँके पाच वर्ष संचालक, तर चार साखर कारखानाचे कार्यकारी संचालक, दोन साखर कारखानाचे चेअरमन राहिले आहेत. या कामाचा अनुभव ते पक्षाच्या वाढीसाठी कसा करून घेतात? व जिल्हातील विस्कटलेली राष्ट्रवादीची घडी कशी बसवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.