पाटलांचा मोदींना धक्का; काँग्रेसची ‘देशमुखी’ राजेसाहेबांकडे

राजेसाहेब देशमुख व काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारीणीच्या कायम निमंत्रीत सदस्या व जम्मू काश्मिर काँग्रेसच्या प्रभारी रजनी पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.
Beed Congress-Rajkishor Modi-Rajni Patil News
Beed Congress-Rajkishor Modi-Rajni Patil News

बीड : अखिल भारतीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्याकडून हा मावळते जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांना धक्काच आहे. (Patil pushes Modi; Congress 'Deshmukhi' to Rajesaheb)राजेसाहेब देशमुख हे अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या कायम निमंत्रीत सदस्या तथा जम्मू काश्मिर काँग्रेसच्या प्रभारी माजी खासदार रजनी पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

आगामी नगर परिषद, नगर पंचायती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर देशमुख यांची झालेली निवड महत्वपूर्ण मानली जाते. (Congress Leader Rajni Patil, Beed) ऐन निवडणुकीच्या पाटलांकडून मोदींना हा जोरका झटका मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीत गेले. (Congress State Commitee Maharashtra) त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसची सुत्रे पाटील दाम्पत्याकडे आली. या काळात पाटील व मोदी यांच्यात कायम विळ्या - भोपळ्याचे राजकीय सख्य राहीले.

अंबाजोगाईच्या स्थानिक राजकारणात राजकिशोर मोदी यांची कायम मांड राहीली. २५ वर्षांपासून नगर पालिकेवर अपवाद वगळता मोदींची कमांड आहे. दरम्यान, २०११ च्या निवडणुकीत मोदींच्याच होमपिचमधील अंबाजोगाई नगर पालिका निवडणुकीत त्यावेळी जिल्हाध्यक्ष असलेल्या अशोक पाटील यांनी बी फॉर्म देण्यासाठी मोदींना खिंडीत गाठल्यानंतर त्यांनी स्थानिक आघाडी करुन निवडणुक लढविली आणि घवघवीत यशही मिळविले.

दरम्यान, सुरुवातीला मोदी यांना तत्कालिन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वरदहस्त होता. नंतर त्यांचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तत्कालिन प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात व विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही सुर जुळले होते. त्यांना संघटना तसेच इतर समित्यांवरही कामाची संधी पक्षाने दिली. वरिल नेत्यांच्या पाठबळावरच त्यांची पाटील गटाशी टक्कर होती.

रजनी पाटलांकडून हिशेब चुकता?

चार वर्षांपूर्वी मंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना अचानक पाटील समर्थक सर्जेराव काळे यांच्या जागी राजकीशोर मोदी यांची जिल्हाध्यक्षपदावर आश्चर्यकारकरित्या निवड झाली होती. आता त्याचा हिशोब पाटील यांनी चुकता केला आहे. रजनी पाटील यांचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तर वजन आहेच. शिवाय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्याच बळावर थेट राष्ट्रीय स्तरावरुनच त्यांचे समर्थक राजेसाहेब देशमुख यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली.

विशेष म्हणजे गुरुवारीच मोदी यांनी आपले समर्थक अॅड. विष्णूपंत सोळंके यांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लावली आणि त्याच रात्री त्यांचे पद गेले.  जिल्ह्यात इतरत्र काँग्रेसला उभारी देण्यात मोदी यांना यश आले नव्हते. जिल्हा परिषदेचे सभापती, पंचायत समितीचे उपसभापती, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अशा संघटनांत राजेसाहेब देशमुख यांनी काम केलेले आहे. हजरजबाबी, आक्रमक आणि विनोदी शैली असलेले राजेसाहेब देशमुख वकृत्व आणि संघटनात्मक बांधणीतही माहीर आहेत. आता जिल्ह्यात काँग्रेसला ते उभारी देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com