माझे उपाध्यक्ष पद म्हणजे राजीव सातव यांच्या कामाची पावती..

राजीव सातव यांनी काँग्रेसची एक मजबुत फळी तयार करत हजारो कार्यकर्ते तयार केले. हा मतदारसंघ सांभाळणे ही आता माझी जबाबादारी आहे .
माझे उपाध्यक्ष पद म्हणजे राजीव सातव यांच्या कामाची पावती..
Congress State Vice president Pradnya Satav News Dehli

दिल्ली ः दिवंगत काॅंग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर सातव कुटुंबियांचे सांत्वन करतांना राहुल गांधी यांनी `तुम्ही काळजी करू नका, सगळा पक्ष आणि गांधी परिवार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे`अशी ग्वाही दिली होती. राहुल गांधी यांनी सातव कुटुंबियांना दिलेला शब्द अखेर खरा करून दाखवला आहे. (My post of Vice President is an acknowledgment of Rajiv Satav's work.) राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची काॅंग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पज्ञा सातव यांच्या निवडीने राजीव सातव समर्थकांमध्ये आनंद पसरला असून पक्षाने दिलेला शब्द खरा करून दाखवला, अशा भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, आपल्याला मिळालेले प्रदेश उपाध्यक्षपद म्हणजे दिवंगत राजीव सातव यांच्या कामाला मिळालेली पावती असल्याची प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली आहे. (Pradnya Satav, Vice President Maharashtra Congress) पक्षाचे आभार मानतानाच राजीव सातवजी यांनी केलेल्या कामाची पोहच पावती मला या पदाच्या रुपाने मिळाली. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यकर्तांना सोबत  घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  महाराष्ट्र प्रदेश काॅंग्ेसच्या वतीने राज्याची नवी कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

मराठवाड्यातील अनेक नेत्यांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे. यात सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव म्हणजे दिंवगत काॅंग्ेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचे आहे. (Congress Leader Rahul Gandhi) राजीव सातव यांचे अवघ्या ३६ व्या वर्षी एका आजाराने निधन झाले. सातव यांच्या निधनाचा धक्का केवळ काॅंग्रेस पक्षालाच नाही तर विरोधी पक्षांना देखील बसला. काॅंग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया व प्रियंका गांधी यांनी तर राजीव सातव यांच्या निधनानंतर आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य गमावल्याचे सांगत शोक व्यक्त केला होता.

राजीव सातव यांनी पक्षवाढीसाठी केलेले काम यामुळे राहुल गांधी यांनी त्यांच्यावर पक्षात महत्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांनी जेव्हा शोकसभेत सातव कुटुंबियांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, तेव्हा संपुर्ण काॅंग्रेस सातव कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, त्यांनी काळजी करू नये, असा विश्वास दिला होता. एवढेच नाही तर राजीव सातव यांचा मुलगा दहावी परीक्षेत उतीर्ण झाल्यानंतर सोनिया व प्रियंका गांधी यांनी फोनवरून सातव कुटुंबियांचे अभिनंदन केले होते.

राजीव सातव यांच्या निधनानंतर गांधी परिवाराने सातव यांची काळजी घेतल्याचे पदोपदी जाणवत होते. आता सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे उपाध्यक्ष पद देत त्यांना सक्रीय राजकारणात आणण्यात आल्याचे देखील यावरून स्पष्ट होते. दरम्यान, प्रदेश उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर प्रज्ञा यांनी ही राजीव सातव यांनी केलेल्या कामाची पावती असल्याचे म्हटले आहे.

पक्ष देईल ती जबाबदारी घेईल..

प्रज्ञा सातव म्हणाल्या, राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधी,  प्रियांकाजी सातत्याने आमच्या कुटुंबियाची विचारपूस करत काळजी करायचे. नेहमी आम्हाला भेटायला बोलवायचे  हिंगोलीत राजीव सातव यांनी काँग्रेसची एक मजबुत फळी तयार करत हजारो कार्यकर्ते तयार केले.  हा मतदारसंघ सांभाळणे ही आता माझी जबाबादारी आहे .

प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आता राज्यसभेवर कधी जाणार? असे विचारले असता, मी आतच सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.  त्यामुळे उमेदवारी विषयी बोलणे योग्य ठरणार नाही. पक्ष देईल ती  जबाबदारी मी स्वीकारेन, असेही प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले . दरम्यान, काॅंग्रेस प्रेदश कार्यकारणीत अनेक वरिष्ठ नेत्यांचे डिमोशन झाल्यामुळे पक्षात नाराजी असल्याची देखील चर्चा आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in