नाव `राणे काम चार आणे`, त्यांनी तोंड सांभाळून बोलावे..

युती धर्म भाजपने पाळला असता तर अडीच वर्षे ते सत्तेत राहिले असते. अडीच वर्षे आम्ही सत्तेत राहिलो असतो
abdul sattar -narayan rane news pune
abdul sattar -narayan rane news pune

पुणे ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या पदाला शोभेल असे बालावे, मोजके बोलावे. पण सध्या त्यांचे नाव राणे आणि काम चार आणे असे झाले आहे. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा शिवसेना त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा  इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. (The name 'Rane Kaam Char Aane', they should speak with their mouths closed. Said State Minister Abdul Sattar) राणेंनी तोंडावर ताबा ठेवला नाही, तर ईट का जवाब पत्थर से कसा दिला जातो, हे शिवसेनेला शिकवायची गरज नाही, असा निर्वाणीचा इशाराही सत्तार यांनी दिला.

पुण्यातील हंडेवाडी भागातील विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रसार मामध्यमांशी बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष भडकला आहे. (Central Minister Narayan Rane) या संदर्भात प्रतिक्रिया देतांना सत्तार यांचा उल्लेख नाव राणे काम चार आणे असा केला. सत्तार म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काम हे चार आणे सारखे आहे .त्यांनी मोजकच बोलावं अन्यथा शिवसेना त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

ईट का जवाब पत्थर से देण्याची आमची देखील तयारी आहे. कायद्यापुढे कोणीही मोठा नाही याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. प्रवीण तोगडिया यांनी राणे आणि शिवसेना भविष्यात एकाच ताटात जेवतील असे भाकित वर्तवले आहे. (Shivsena Minister Abdul Sattar) यावर उद्धव ठाकरे हे राणे यांना कधीच आपल्या ताटात जेवू देणार नाही. तोगडिया यांचे ते वैयक्तिक मत असेल. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अशी कुठलीच शक्यता नसल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

युती धर्म भाजपने पाळला असता तर अडीच वर्षे ते सत्तेत राहिले असते. अडीच वर्षे आम्ही सत्तेत राहिलो असतो, पण आता ते आंब्याच्या झाडाखाली नाही, तर  बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत, असा टोलाही सत्तार यांनी लगावला. केंद्राने राज्याच्या हक्काचे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये अडवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी असताना त्यांनी आधीच यात्रा काढली आहे.  त्यामुळे यापुढे राणेंनी जबाबदारीने वागावे, असा सल्लाही सत्तार यांनी दिला. पुण्यातील हांडेवाडी परिसरात नाना भांगरे यांनी केलेल्या विविध कामाचा शुभारंभ सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव,नगरसेविका प्राची आल्हाट व  इतरांची उपस्थिती होती.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com