पंकजा मुंडेकडून डाॅ. कराडांचे स्वागत; समर्थकांची मात्र विरोधात घोषणाबाजी..

भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
Bjp Minister Dr. Karad-Parli Jan Ashirwad Yatra News
Bjp Minister Dr. Karad-Parli Jan Ashirwad Yatra News

परळी ः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली जन आर्शिवाद यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांच्या हस्ते भाजपचा ध्वज दाखवून होणार आहे. (Dr. Pankaja Munde Karad's welcome) यासाठी सोमवारी (ता.१६) सकाळीच डॉ. कराड हे परळीत पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडेयांनी कराड व त्यांच्या पत्नीचे स्वागत केले. मुंडे भगिनींनी जरी कराडांचे स्वागत केले असले तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र विरोधात घोषणाबाजी केली.

पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है, अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे, अशा घोषणा देत समर्थकांनी आपला संताप व्यक्त केला. ( Central State Fianance Minister Dr.Bhagwat Karad) दरम्यान कराड यांच्या जन आशिर्वाद यात्रा व परळी दौऱ्याच्या निमित्ताने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंकजा मुंडे यांच्यांशी चर्चा केल्यानंतर ही सगळी नेते मंडळी परळी वैद्यनाथाच्या आरतीसाठी मंदिराकडे गेली.

सध्या राज्यातील सर्वच धार्मिकस्थळे बंद असल्यामुळे डाॅ. कराड, पंकजा, प्रीतम मुंडे, आमदार अतुल सावे व इतर पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आरती केली.  (Bjp Leader Pankaja Munde) त्यानंतर हे सर्वजण गोपीनाथ गडाकडे रवाना झाले. (Mp Pritam Munde) जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड यांचे पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी आगमन झाले.  पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केले.

परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.यावेळी समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

वैद्यनाथाची आरती..

दरम्यान डॉ भागवत कराड यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेतले. सध्या कोविड मुळे मंदिर बंद असल्याने डॉ. कराड यांनी पायरीवर सहकुटुंब पुजा,आरती केली. यावेळी सोबत पंकजा मुंडे, खासदार डॉ प्रितम मुंडे उपस्थित होत्या. देवस्थान ट्रस्टच्या वतीने डॉ कराड यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. कराड गोपीनाथ गडावर रवाना झाले. गोपीनाथ गडावरून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होणार आहे. स्वतः पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यात सहभागी होणार आहेत.  

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com