भाजप, राष्ट्रवादीच्या आमदारांनी फुंकले पालिका निवडणुकीचे रणशिंग; पिंपरीवरच दोन्ही पक्षांचे लक्ष

पालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिक सज्ज असून त्यांनी पक्षाचा महापौर करण्याचा निर्धार केल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येक बूथवर दहा शिवसैनिकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
BJP, NCP MLAs blow the trumpet of municipal elections; The attention of both the parties is on Pimpri
BJP, NCP MLAs blow the trumpet of municipal elections; The attention of both the parties is on Pimpri

पिंपरी : सात महिन्यावर आलेल्या २०२२ च्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची तयारी सत्ताधारी भाजप व विरोधी राष्ट्रवादीने सुरु केली आहे. त्यासाठी शहराचा मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असलेल्या पिंपरीवरच या दोन्ही पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. कारण राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक येथून निवडून आले असून चिंचवड व भोसरी या शहरातील इतर दोन विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत कमी ताकद असल्याने भाजपनेही पिंपरीलाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे या दोघांत खरी लढाई येथेच होणार आहे. BJP, NCP MLAs blow the trumpet of municipal elections; The attention of both the parties is on Pimpri

शिवसेनेनेही आपले शिवसंपर्क अभियान नुकतेच याच मतदारसंघात घेतले. त्याव्दारे त्यांनी शहरात आपला महापौर करण्याचा दावा ठोकला आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेत २०१७ ला प्रथमच बहूमताने सत्तेत आलेल्या भाजपचे सध्या ७६ नगरसेवक आहेत. तर आता त्यांनी २०२२ च्या पालिका निवडणुकीसाठी 'मिशन १००+' ची आरोळी दिली आहे. त्याकरिता शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी शहरात 'बूथ सक्षमीकरण' अभियान व कार्यकर्त्यांच्या 'डोअर टू डोअर' भेटीगाठीस पिंपरीतूनच नुकतीच (ता.१७) सुरवात केली. 

भाजपचा एकही नगरसेवक गतवेळी निवडून न आलेल्या मोहननगर प्रभागातील (क्र.१४) जुन्या कार्यकर्त्या डॉ. प्रतिभा लोखंडे व अनिल लोखंडे यांच्या घरापासून या अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला.त्यात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या यावेळी अध्यक्षांनी समजावून घेत त्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप देऊन जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. 

भाजप शहर सरचिटणीस राजु दुर्गे तसेच गणेश लंगोटे आणि कैलास कुटे यांनी या अभियानाचे नियोजन केले.हा उपक्रम असाच शहरभर सुरु राहणार आहे. दुसरीकडे आमदार बनसोडे यांनीही पालिका निवडणुकीची तयारी करीत आपल्या आमदार निधीतील कामांचा शुभारंभ मतदारसंघातील दापोडीतून केला. यावेळी तेथील नागरिकांनी परिसरातील अडचणीसंबधी गाऱ्हाणे मांडले. त्याची तात्काळ दखल घेत आमदारांनी त्यांचे निवारण केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

सोसायट्यांचेही प्रश्न मार्गी लावल्याने गणेश हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष रामुताज  प्रजापती यांनी आमदारांचे आभार मानले. वर्क फ्रॉम होम सुरळीत करता यावे म्हणून वीजपुरवठ्यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे आमदार बनसोडे यांनी सांगितले. नगरसेवक रोहित अप्पा काटे, नगरसेविका माई काटे, नगरसेवक राजभाऊ बनसोडे, युवा नेते सिद्धार्थ बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेनेही आपले शिवसंपर्क अभियान पिंपरीतच नुकतेच १४ ते १७ जुलैदरम्यान राबवून पिंपरी पालिका निवडणुकीची हाळी दिली. याव्दारे पक्षाची ध्येय धोरणे घरोघरी पोचवण्याचे काम केले जात आहे. पालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिक सज्ज असून त्यांनी पक्षाचा महापौर करण्याचा निर्धार केल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येक बूथवर दहा शिवसैनिकांची नेमणूक करण्यात येणार आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com