लाॅकडाऊन उठवा, नाहीतर रस्त्यावर उतरून दुकाने उघडू; मग केसेस झाल्या तरी बेहत्तर.. - Get up the lockdown, or get down the street and open the shops; Then the cases are better.jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

लाॅकडाऊन उठवा, नाहीतर रस्त्यावर उतरून दुकाने उघडू; मग केसेस झाल्या तरी बेहत्तर..

विजय पाटील
मंगळवार, 20 जुलै 2021

लोकांच्या सहनशिलतेलाही काही मर्यादा असतात, पण प्रशासन जर याचा विचार करणारच नसेल तर मग आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल.

सांगली ः लोकांची सहनशिलता संपली आहे, आणखी किती दिवस हाल सहन करायचे असा संतप्त सवाल करत लाॅकडाऊन उठवा, नाहीतर रस्त्यावर उतरून दुकाने उघडू, मग केसेस झाल्या तरी बेहत्तर अशा शब्दांत खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाला इशारा दिला. (Get up the lockdown, or get down the street and open the shops; Then the cases are better.)  काही तालुक्यांची शिक्षा इतरांना का? असा सवाल देखील त्यांनी केला.

जिल्ह्यातील लाॅकडाऊनच्या विरोधात लोकांमध्ये रोष पसरला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून व्यापार, व्यवसाय बंद असल्याने सर्वच वर्गाचे हाल होत आहे. प्रशासन मात्र यावर काहीच मार्ग काढायला तयार नाही. (Mp Sanjay Kaka Patil, Sangali) जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे त्याचा फटका इतर तालुक्यांना सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय काका पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा प्रशासनाला गर्भित इशारा दिला आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन उठण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घ्या,  नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. लोकांची सहनशिलता आता संपली आहे, प्रशासनाने वेळीच अनलाॅकचा निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरून दुकान उघडी करावी लागतील.

मग आमच्यावर केसेस झाल्या तरी त्याची पर्वा करणार नाही.  किती दिवस सहन करायचे, सर्वच ठप्प झाले आहे. लोकांच्या सहनशिलतेलाही काही मर्यादा असतात, पण प्रशासन जर याचा विचार करणारच नसेल तर मग आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल. व्यापार बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहेत.  कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक  झाल्यानंतर कोरोना संसर्ग व रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले.

वाळवा, कडेगाव, पलूस या तालुक्याची शिक्षा इतर तालुक्यांनी का करता?  ज्या तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या कमी आहे, तिथे निर्बंध शिथील करून दुकाने उघडली गेली पाहिजे, असेही काका पाटील म्हणाले.  तसेच कोरोनाच्या काळात ज्या अधिकाऱ्यांनी काम केले नाहीत, जनतेला वेठीस धरले अशा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

हे ही वाचा ः काॅंग्रेस स्वबळावरच, नाना पटोलेंना थेट राहुल गांधींचा ग्रीन सिग्नल..

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख