भोसरीतील भाजप नगरसेवकाचे अजितदादांना पुण्यात साकडे

प्राधिकरणाच्या हद्दीतील जागांचा सातबारा त्या त्या कष्टकऱ्यांच्या नावावर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्या जागेवरील घरे नाममात्र दर आकारून नियमित करण्यात यावीत. तसे पालिका प्रशासनाला निर्देश देण्याची कार्यवाही राज्य सरकारने करावी, असे साकडे लांडगे यांनी अजितदादांना यावेळी घातले.
भोसरीतील भाजप नगरसेवकाचे अजितदादांना पुण्यात साकडे
BJP corporator from Bhosari Meet Ajit Dad in Pune

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा असलेले भोसरीतील भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक रवी लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल (ता.३) पुण्यात भेट घेतली. पवार काल पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. तरी लांडगे यांनी पुण्यात त्यांची गेल्या काही महिन्यात ही दुसऱ्यांदा भेट घेतल्याने तिची चर्चा झाली. दरम्यान, विलिनीकरण झालेल्या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीत राहणाऱ्यांच्या जागेवरील प्राधिकरणाचे शिक्के काढून ती जागा तेथे राहणाऱ्यांच्या नावे करण्यासाठी दादांना भेटल्याचे लांडगे यांनी सरकारनामाला सांगितले. BJP corporator from Bhosari Meet Ajit Dad in Pune

हा प्रश्न निश्चितपणे सुटण्यासारखा आहे. तो मार्गी लावण्यासाठी सरकार पातळीवर योग्य तो निर्णय नक्की घेऊ, अशी ग्वाही दादांनी दिल्याची माहिती लांडगे यांनी या भेटीनंतर दिली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप रुजवून ती वाढविणारे स्व.शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे रवी हे पुतणे आहेत. गतवेळी २०१७ ला ते बिनविरोध निवडून आले आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त (१५ ऑगस्ट) गेल्या महिन्यात त्यांनी आता वेळ बदलणार या मथळ्याच्या लावलेल्या फ्लेक्सची शहरभर चर्चा झाली होती.

कारण त्यावर भाजपऐवजी राष्ट्ववादीच्या नेत्यांचे फोटो होते. त्यातून त्यांच्या भाजपमधील आऊटगोईंगचे संकेत मिळाले आहेत. या वर्षाअखेरीस ते होईल, असा अंदाज आहे. यापूर्वी त्यांनी अजितदादांची मुंबईत भेट घेतली होती. तर, कालच्या भेटीत त्यांनी दादा, प्राधिकरणातील रहिवाशांच्या नावे सातबारा करा, अशी विनंती निवेदनाव्दारे केली. हा सरकारी शिक्का कायमचा पुसून जनहिताचा निर्णय घेण्याची धमक फक्त तुमच्यातच आहे. शेकडो कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न आपल्यासारख्या पिंपरी-चिंचवड शिल्पकराच्या हातानेच मार्गी लागू शकतो.

त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतील जागांचा सातबारा त्या त्या कष्टकऱ्यांच्या नावावर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्या जागेवरील घरे नाममात्र दर आकारून नियमित करण्यात यावीत. तसे पालिका प्रशासनाला निर्देश देण्याची कार्यवाही राज्य सरकारने करावी, असे साकडे लांडगे यांनी अजितदादांना यावेळी घातले. त्यानंतर हा प्रश्न समजावून घेत तो कायमचा मार्गी लावण्याबाबत लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेण्याची ग्वाही अजितदादांनी दिली. यावेळी लांडगेंबरोबर भोसरीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत हे होते. 

प्राधिकरण ५० वर्षांनंतर नुकतेच विसर्जित झाले. ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीन करण्यात आले. विलीनीकरणानंतर प्राधिकरणाच्या सर्व चल, अचल, मालमत्ता, दायित्वे, कार्यालये, व्यापारी इमारती, ठेवी आणि इतर गुंतवणूक पीएमआरडीएकडे हस्तांतरीत केली जाणार आहेत.  तर प्राधिकरणाने विकसित करुन दिलेले भूखंड, आरक्षित व अतिक्रमण झालेल्या भूखडांची मालकी किंवा ताबा पिंपरी पालिकेकडे राहणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी औद्योगिक वसाहत आहे.

या वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कित्येक कष्टकऱ्यांनी प्राधिकरणाच्या हद्दीतील एक, दीड किंवा दोन गुंठा जमीनी घेतल्या. त्यावर स्वतःच्या स्वप्नातील घरे बांधली. पोटापाण्यासाठी आलेले हे कष्टकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातील आहेत. त्यांनी पोटाला चिमटा काढून पै-पै जमवून या जागांवर घरे बांधली आहेत. परंतु, त्यावर प्राधिकरणाचा शिक्का आहे. विलीनीकरणानंतर आता प्राधिकरणाच्या हद्दीतील घरांच्या भूखंडाची मालकी किंवा ताबा पालिकेकडे असणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in