पंढरपूरच्या विजयाबद्दल भेगडेंचा फडणवीसांकडून मुंबईत खास सत्कार

हा सत्कार माझा नसून तो माझ्याबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांचा असल्याचे उत्तर भेगडेंनी सत्काराला दिले.
Bjp leader Devendra Fadanvis - Bala Bhegde news Pimpri
Bjp leader Devendra Fadanvis - Bala Bhegde news Pimpri

पिंपरीः  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे एक शिल्पकार आणि पक्षाचे सोलापूर प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांचा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत विशेष सत्कार करण्यात आला.  (Bala Bhegade Felicited by Devendra Fadanvis for his Roll in Wining by Election of Pandharpur- Mangalvedha) हा सत्कार माझा नसून तो पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेचा व माझ्याबरोबर काम केलेल्या भाजप व आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा असल्याची भावना भेगडे यांनी सत्कारानंतर व्यक्त केली.

या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील  राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा भाजपचे समाधान आवताडे यांनी पराभव केला. त्यासाठी पंढरपूरात १५ दिवस तळ ठोकून बसलेले भेगडे यांच्या कामाची पक्षाने तातडीने दखल घेत त्यांचा खास सत्कार केला.

यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन,सदाभाऊ खोत,भाजपचे संघटनमंत्री श्रीकांत भारतीय,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक,राम सातपूते, सचिन कल्याणशेट्टी,जयकुमार गोरे,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.
 
पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी केल्याबद्दल फडणवीसांनी माजी राज्यमंत्री भेगडेंचे अभिनंदन केले. तर, हा सत्कार माझा नसून तो माझ्याबरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांचा असल्याचे उत्तर भेगडेंनी सत्काराला दिले. भेगडे यांनी प्रचाराचे योग्य नियोजन केल्याची तपस्या फळास आली.

त्यांनी विखूरलेले गटतटच नाही, तर त्यांचे नेते व कार्यकर्त्यांचीही मोट बांधली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही जागा त्यांच्या उमेदवाराला सहानुभूतीची लाट असूनही भाजपच्या ताब्यात आली.  दरम्यान, भाजपला यानिमित्ताने विजयाची भेट मिळाली,तर भेगडेंनाही कोरोनाने मतदानाच्या दिवशी गाठले होते. त्यालाही त्यांनी हारवले. त्यानंतर आज हा सत्कार झाला.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com