काँग्रेसला अपयश येते तेव्हा चिंता वाटते : संजय राऊतांची 'तळमळ' 

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, तशी आघाडी देशपातळीवर असावी. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली.
 Sanjay Raut .jpg
Sanjay Raut .jpg

मुंबई :  काँग्रेस (Congress) पक्षाला आसाममध्ये चांगले यश मिळाले आहे, मात्र सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडंफार यश आले. पण काँग्रेसने अजून मुसंडी मारणे जास्त गरजेचे आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात भाजपविरोधाची आघाडी आहे. काँग्रेसला अपयश येते तेव्हा चिंता वाटते, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut made a big statement about the Congress)

राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी चांगली मुसंडी मारली. भविष्यात त्यांनी देशात विरोधीपक्षाची भक्कम आघाडी उभी करुन एक आव्हान उभे करावे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस असेल. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, तशी आघाडी देशपातळीवर असावी. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याशी चर्चा झाली. लवकरच याबाबत हालचाली सुरु होतील. असेही राऊत म्हणाले. 

यावेळी राऊत म्हणाले, मी असे कुठे म्हणतोय की आघाडीला नवे नेतृत्व हवे, एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. प्रत्येकाला वाटते मीच नेता आहे, तसे होत नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नेता केले आणि सरकार उत्तम चाललंय. महाविकास आघाडी देशातील एक आदर्श आघाडी आहे. तीन भिन्न विचाराचे पक्ष एकत्र आले. राष्ट्रीय स्तरावर देखील अशी नवीन आघाडी निर्माण करावी. सगळ्यांनी एकत्र यावे, असे मत मी व्यक्त केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत पुण्यामध्ये तीन कोविड सेंटरचे उद्घाटन केले. हे तीनही कोविड सेंटर सरकारी नाहीत. हे शिवसेनेच्या माध्यमातून उभे केले आहे. महारष्ट्राची स्थिती चांगली आहे कारण? राज्यात सरकारला समांतर अशी कोविड सेंटर आणि यंत्रणा राजकीय कार्यकर्तेही उभे करत आहेत. त्यामुळे सरकारवरचा भार कमी होत आहे. हे इतर राज्यात झाले नाही. इतर राज्यांमध्ये शिवसेने सारखे काम इतर पक्षांना जमले नाही. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये आज चिता पेटलेल्या दिसत, असल्याचे राऊत म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मृत्यूचे आकडे लपवले जात असल्याचे म्हटले होते. याबाबत राऊत यांना विचारले असता फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना अशाप्रकारचे वक्तव्य करणे हे बहुधा विरोधी पक्षाच्या कार्याचा भाग असेल. त्यांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उत्तर दिलेले आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. महाराष्ट्र पॅटर्न संदर्भ गेल्या महिन्याभरापासून वारंवार येतोय. महाराष्ट्र पॅटर्नचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याच महाराष्ट्र पॅटर्नवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. महाराष्ट्र या लढाईत पुढे आहे. राज्याने स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर निर्माण केली आणि लढली. त्याचे श्रेय नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना द्यावे लागेल, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com