नेत्यांना एकत्रित करून सक्रिय केले, तर.. पिंपरी महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता

फक्त अजित पवार हे शहरात आले की हे सर्व नेते तेवढ्यापुरते एकत्र येतात व नंतर पुन्हा पांगतात,या चर्चेलाही बळ मिळाले आहे. दरम्यान, आगामी पालिका निवडणूक तयारीसंदर्भातच या बैठकीत चर्चा झाली, प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला, असे शहराध्यक्ष वाघेरे आज यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.
So .. NCP's power in Pimpri Municipal Corporation again
So .. NCP's power in Pimpri Municipal Corporation again

पिंपरी : सात महिन्यांवर आलेली पुणे व पिंपरी-चिंचवड Pimpari Chinchwad  महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढे न जाता ठरलेल्या वेळेनुसार येत्या फेब्रुवारीत होण्याचे संकेत मिळताच राष्ट्रवादी NCP या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. या दोन्ही शहरातील पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी पुण्यात मंगळवारी (ता.१५) स्वतंत्र बैठका घेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील दिग्गज नेत्यांना एकत्र आणून त्यांना सक्रिय करण्याची मागणी पुढे आली. त्यातून पक्ष पुन्हा सत्ता येऊ शकते, असा दावा करण्यात आला. So .. NCP's power in Pimpri Municipal Corporation again

पिंपरी पालिकेत चुकीची कामे चालली असून ती जनतेसमोर येतील, अशारितीने मांडा, असा आदेश प्रदेशाध्यक्षांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला. कोरोना कमी झाल्याने शहर राष्ट्रवादीची निवडणूक तयारीची बैठक प्रथमच झाली. ती सव्वातास चालली. त्यानंतर पुणे शहराची ती झाली. सध्याच्या चारऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करून ही निवडणूक घेण्याचे जवळपास निश्चीत झाल्याने तसेच ती ठरलेल्या वेळेत होण्याची शक्यता वाढल्याने पुन्हा सत्तेत येण्यासाठी उत्सुक असलेली राष्ट्रवादी सुखावली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील,महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शहर सरचिटणीस व प्रवक्ते फजल शेख,निरीक्षक उज्वला शेवाळे, पिंपरी, चिंचवड, भोसरी या विधानसभा मतदारसंघाचे पक्षाचे अध्यक्ष, शहर युवक अध्यक्ष आदी प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आगामी पालिका निवडणुकीत पक्षाचे  ७० टक्के उमेदवार हे नवीन असतील.

त्यामुळे प्रभागरचना व आरक्षण जाहीर होताच लगेचच त्यांना तयारीला वेळ द्या. जेणेकरून त्यांना सत्ताधारी भाजपच्या पैशाच्या लढाईविरुद्ध जिंकण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल, अशी यावेळी करण्यात आली. शहरातील ज्येष्ठ नेत्यांना एकत्र आणून त्यांना अॅक्टिव्ह केले व त्यांच्या भागातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली,तर पुन्हा पालिकेत पक्षाची सत्ता येऊ शकते,असा दावा पक्षाच्या एका  जबाबदार पदाधिकाऱ्याने यावेळी केला. 

या ज्येष्ठ नेत्यांना बोलावून त्यांच्यावर ही कामगिरी सोपवा, म्हणजे आपल्याला आदेश आला नाही, असे त्यांना सांगण्यास जागा राहणार नाही, असेही हा पदाधिकाऱी म्हणाला.त्यातून पक्षामध्ये शहरात सवतासुभा व पदाधिकाऱ्यांत एकवाक्यता नसल्याला दुजोरा मिळाला आहे. फक्त अजित पवार हे शहरात आले की हे सर्व नेते तेवढ्यापुरते एकत्र येतात व नंतर पुन्हा पांगतात,या चर्चेलाही बळ मिळाले आहे. दरम्यान, आगामी पालिका निवडणूक तयारीसंदर्भातच या बैठकीत चर्चा झाली, प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला, असे शहराध्यक्ष वाघेरे आज यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com