नंबर प्लेट नसलेल्या मोटारीने पोलिसांच्या हाती लागले साडेसहा कोटींचे रक्तचंदन

रात्र गस्तीवर असलेले वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक वंदू गिरे यांना ताथवडेजवळ एक विना नंबरप्लेटची मोटार दिसली. त्यामुळे संशय येऊन ते चौकशीसाठी जवळ गेले असता दोघे पळून गेले, तर तिघे सापडले. नंतर त्यांच्या चौकशीतूनएका हॉटेलसमोर पार्क केलेला आणि चोरीच्या रक्तचंदनाच्या ओंडक्यांनी भरलेला ट्रक मिळून आला.
Police seized blood sandalwood worth Rs 6.5 crore from a car without number plate
Police seized blood sandalwood worth Rs 6.5 crore from a car without number plate

पिंपरी : नंबर प्लेट नसलेल्या एका मोटारीमुळे साडेसहा कोटी रुपयांचे रक्तचंदनाचे (Blood Sandale wood) घबाड पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे तामिळनाडूतून (Tamilnadu) परदेशी होणारी साडेसहा हजार किलो औषधी वनस्पतीची तस्करी रोखली गेली. आंतरराष्ट्रीय टोळी यामागे असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वाकड पोलिसांच्या या कामगिरीचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (KrishnaPrakash) यांनी पत्रकारपरिषद घेऊन कौतूक केले. (Police seized blood sandalwood worth Rs 6.5 crore from a car without number plate)

सहा हजार ४२० किलो वजनाचे रक्तचंदनाचे २०७ ओंडके, एक मोटार, ट्रक असा सहा कोटी ५२ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी निलेश विलास ढेरंगे (वय ३५, रा. पिंपळगाव, संगमनेर,जि.नगर), एम.ए.सलीम (वय ४३,रा.कर्नाटक), विनोद प्रकाश फर्नांडिस (वय ४५),झाकीर हुसेन अब्दूल रहमान शेख (वय ५०, रा. ट्रॉम्बे,मुंबई) आणि मिन्टोभाई ऊर्फ निर्मलसिंग मनजितसिंग गिल (वय ३६, रा. कळंबोली, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली. 

रात्र गस्तीवर असलेले वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक वंदू गिरे यांना ताथवडेजवळ एक विना नंबरप्लेटची मोटार दिसली. त्यामुळे संशय येऊन ते चौकशीसाठी जवळ गेले असता दोघे पळून गेले, तर तिघे सापडले. नंतर त्यांच्या चौकशीतून एका हॉटेलसमोर पार्क केलेला आणि चोरीच्या रक्तचंदनाच्या ओंडक्यांनी भरलेला ट्रक मिळून आला. पळून गेलेल्या दोघांना नंतर नवी मुंबईहून पकडून आणण्यात आले. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, निरीक्षक संतोष पाटील, सुनील टोपे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील. अभिजित जाधव व पथकाने ही कामगिरी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com