तृणमूलचे दोन मंत्री, आमदार, माजी महापौर सकाळी सीबीआयच्या जाळ्यात अन् संध्याकाळी जामिनावर बाहेर

नारद भ्रष्टाचार प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे दोन मंत्री, एक आमदारासह माजी महापौराला अटक करण्यात आली होती.
tmc leaders arrested by CBI in Narada case granted bail by Court
tmc leaders arrested by CBI in Narada case granted bail by Court

कोलकता : नारद भ्रष्टाचार (Narada Scam)  प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे (TMC) दोन मंत्री, एक आमदारासह माजी महापौराला आज सकाळी सीबीआयने (CBI) अटक करण्यात आली. न्यायालयाने सायंकाळी त्यांची जामिनावर मुक्तता केली. यावरुन पश्चिम बंगालमधील (West Bengal) राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्टिंग ऑपरेशन घडवून आणलेल्या नारद न्यूज पोर्टलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू सॅम्युअल या कारवाईवर आता काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सीबीआयने तृणमूलचे विद्यमान मंत्री सुब्रत मुखर्जी, फिरहाद हकीम, आमदार मदन मित्रा आणि कोलकत्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांना अटक केली. आज सायंकाळी या चौघांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, सीबीआयच्या कारवाईवर मॅथ्यू सॅम्युअल यांनी समाधान व्यक्त केले. परंतु, सीबीआयने पक्षपात न करता यात अडकलेल्या सर्व नेत्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांना अटक का झाली नाही, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

स्टिंग ऑपरेशनमधील आवाजाची न्यायवैद्यक चाचणी केल्यानंतर तो आवाज स्वतःचा असल्याची कबुली सुवेंदू अधिकारी यांनी दिली होती, असे मॅथ्यू यांनी नमूद केले. भाजप नेते मुकुल रॉय यांच्या सूचनेवरून मॅथ्यू यांच्याकडून पैसे स्वीकारल्याची माहिती त्‍यावेळी एका आयपीएस अधिकाऱ्याने देऊनही सीबीआयने रॉय यांना अभय दिल्याबद्दल मॅथ्यू यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

नारद स्टिंग ऑपरेशनमधील गैरव्यवहार हा मार्च २०१६ मधील विधानसभा निवडणुकीवेळी झाला होता. नारद न्यूज पोर्टलचे मॅथ्यू सॅम्युअल यांनी निवडणुकीआधी व्हिडिओ चित्रफीत प्रसारित करीत पश्‍चिम बंगालच्या राजकारणाला मोठा धक्का दिला होता. या चित्रफीतीत ते एका कंपनीचे प्रतिनिधीच्या रूपात दिसून आले. तृणमूल काँग्रेसचे सात खासदार, तीन मंत्री आणि कोलकता महापालिकेचे महापौर सोवन चॅटर्जी यांना कामाच्या बदल्यात ते मोठी रक्कम देत असल्याचे दिसू आले. 

हे भ्रष्टाचाराचे प्रकरण सीबीआयपर्यंत पोचू नये, यासाठी तृणमूल काँग्रेसने मोठा आटापिटा केला होता. भाजपचे  हे कारस्थान असल्याचा आरोपही केला, परंतु, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारविरोधात निकाल दिला होता. स्टिंग ऑपरेशन’संबंधी सीबीआयकडून तपास करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मार्च २०१७मध्ये दिला होता. तृणमूल सरकारने सॅम्युअल यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करीत त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. उच्च न्यायालयाने सॅम्युअल यांना दिलासा दिला होता. न्यायवैद्यक तपासणीत चित्रफीत खरी असल्याचे सिद्ध झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com