भाजप शिवसेना एकत्र येणार का?, त्यावर नारायण राणे म्हणाले...

आमचा पक्ष जे ठरवेल, तो आदेश मी शिरसावंद्य मानेल. भविष्यात भाजप-सेना युती करायची की नाही, हा निर्णय श्रेष्ठी घेतील.शिवसेनेत मी ३९ वर्षे काढली आणि येवढा प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कॅबिनेट मंत्री बनलो.
भाजप शिवसेना एकत्र येणार का?, त्यावर नारायण राणे म्हणाले...
Narayan Rane BJP-Shivsena

नागपूर : मी आजही बाळासाहेब ठाकरेंचा Balasaheb Thackeray सन्मान करतो. ते आजही मला गुरुस्थानी आहेत. माझी राजकीय कारकीर्दच त्यांनी घडवलेली आहे. बाळासाहेब असेपर्यंत मी पूर्णवेळ शिवसेनेत काम केले. नंतर नंतर माझे उद्धव ठाकरेंसोबत Uddhav Thackeray जमत नव्हते. उद्धव ठाकरेंमुळेच मी शिवसेना सोडली I left shivsena because of Uddhav Thackerayआणि त्यानंतर येथपर्यंतचा राजकीय प्रवास केला. समजा उद्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झालीही तरी भाजपचे श्रेष्ठी जे सांगतील, त्याप्रमाणे मी काम करतच राहणार आहे, असे एमएसएमई मंत्री नारायण राणे MSME Minister Narayan Rane म्हणाले. 

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राणे म्हणाले, आमचा पक्ष जे ठरवेल, तो आदेश मी शिरसावंद्य मानेल. भविष्यात भाजप-सेना युती करायची की नाही, हा निर्णय श्रेष्ठी घेतील. शिवसेनेत मी ३९ वर्षे काढली आणि येवढा प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कॅबिनेट मंत्री बनलो. त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो. मी कुणालाही म्हटले नव्हेत की, मला मुख्यमंत्री बनवा. पण बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री बनवले. आजही मी कुणाला म्हटलेलं नव्हतं की, केंद्रात मला कॅबिनेट मंत्री बनवा. तरीही पक्षश्रेष्ठींनी मला मंत्रिपद दिले. ज्या पक्षात मी असतो त्या पक्षासाठी काम करतो आणि त्या कामाची दखल त्या त्या पक्षांचे श्रेष्ठी घेत असतात. मला जी पदे मिळाली, ती माझ्या कामाच्या बळावर मिळालेली आहेत.

एमएसएमही हे फार मोठे मंत्रालय आहे. याआधी हे मंत्रालय भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी सांभाळत होते. मी नुकताच या खात्याचा पदभार सांभाळलेला आहे. त्यामुळे आजच या खात्याबद्दल आणि नियोजनाबद्दल काही सांगता येणार नाही. किमान १५ दिवस काम केल्यानंतर या खात्याअंतर्गतच्या योजना आणि त्यासाठी भविष्यातील नियोजन काय असेल, त्याबद्दल सांगेन. लगेच काही प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असे नारायण राणे म्हणाले. 

कोरोनाच्या परिस्थितीत ८० टक्क्याच्या वर लघुउद्योग बंद पडले, तर बव्हंशी उद्योग अजूनही संकटात सुरू आहेत. या उद्योगांना कशी उभारी देता येईल, यावर काम सुरू केले आहे. लवकरच एमएसएमई अंतर्गतच्या उद्योग व्यवसायांची भरभराट होईल, यासाठी मोठे काम करण्याचा मानस आहे. हे खाते चांगल्या पद्धतीने चालवणार आहे आणि याअंतर्गत येणाऱ्या उद्योगांतील सर्वांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. आतापर्यंत राज्यात कामे केले आणि आता केंद्रात करायचे आहे. पक्षाने देशपातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करणार आहे. शेवटी काम करणाऱ्याला काही फरक पडत नाही की, राज्य आहे की देश आणि मी सतत काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे येथेही पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवून दाखवेन, असे नारायण राणे म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in