सीईओंनी केवळ कारवाईचा बडगाच उगारला नाही, तर समस्याही सोडवल्या...

अनेक वर्षापासून रखडलेली पदोन्नती देण्यात येत आहे. यासाठी त्यांनी समुपदेशनाचा मार्ग अवलंबिला आहे. यामुळे पदोन्नती व नियुक्तीच्या तक्रारीच बेपत्ता झाल्यात.
ZP Nagpur
ZP Nagpur

नागपूर : जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे रामभरोसे, असेच काहीसे चित्र सामान्यजनांच्या मनात आहे. येथे काम वेळेत होईल, ही अपेक्षाच कुणी करत नाही. त्यातही विषय पदोन्नती आणि नियुक्तीचा असेल, तर फाइलींवर ‘वजन’ ठेवल्याशिवाय काम होणार नाही, असाच समज कर्मचाऱ्यांचा आहे. पण सीईओ योगेश कुंभेजकर CEO Yogesh Kumbhejkar यांनी हा समज मोडीत काढला आहे. कर्मचाऱ्यांवर त्यांनी केवळ कारवाईचा बडगाच उगारला, असे नाही, तर त्यांच्या समस्याही सोडवल्या. CEO not only took action but solve the problems of employees.

सरकारी काम महिनाभर थांब, असे म्हटले जाते. तर विभागातील काम ‘अर्थ’पूर्ण धक्का लागल्याशियाव काम होत नसल्याचे चित्र आहे. हे चित्र पालटवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर करीत आहेत. जिल्हा परिषदेतील खाबुरिगीला चाप लावत समुपदेशनातून पदोन्नतीसोबत नियुक्ती देण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. 

जिल्हा परिषदेत पदोन्नती आणि नियुक्तीचे प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. सेवापुस्तिका अपडेट नसल्याच्या कारणावरून पदोन्नती रखडली होती. परंतु यामागे मोठे अर्थपूर्ण कारण असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती. सीईओ कुंभेजकर यांनी सर्वांच्या सेवापुस्तिका अपडेट करण्याचे आदेश दिले. यावर विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. तसेच कामचुकारपणा व हयगय करणाऱ्यांची थेट एक वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्हा परिषदेतील कामचुकार व खाबूगिरी करणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून कामे गतीने होत आहे. नुसता कारवाईचा बडगा उभारला नाही, तर त्यांच्या समस्याही सोडविल्या जात आहे. 

अनेक वर्षापासून रखडलेली पदोन्नती देण्यात येत आहे. यासाठी त्यांनी समुपदेशनाचा मार्ग अवलंबिला आहे. यामुळे पदोन्नती व नियुक्तीच्या तक्रारीच बेपत्ता झाल्यात. नुकतेच त्यांनी शिक्षकांना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती दिली. ९ जागा पदोन्नतीने भरायच्या होत्या. त्याकरता १८ अर्ज होते. पदोन्नती देत समुपदेशनाने नियुक्ती दिली. उमेदवाराच्या मताने नियुक्तीने मिळाल्याने सर्वांचेच समाधान झाले. त्यापूर्वी अनुकंपाची भरती प्रक्रिया राबविली. अनेक वर्षापासून ती प्रलंबित होती. यादीतील क्रम कमी जास्त करून ही प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप अनेकदा झालेत. सीईओंनी तत्काळ सेवेत घेत नियुक्ती दिली. त्याचप्रमाणे चतुर्थ कर्मचाऱ्यांना तृतीय वर्गात पदोन्नती दिली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com