टायगर जेथे ‘पंजा’ मारतो, तेथेच त्याचे साम्राज्य तयार होते…

आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याचा शब्द आपल्याला दिला होता. पण केंद्रात ७ वर्ष सत्ता उपभोगूनही सरकारने आपल्याला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे आपल्याला विद्यमान केंद्र सरकारच्या विरोधात मोठा संघर्ष उभारावा लागणार आहे
Nana Patole
Nana Patole

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांच्या उपस्थितीत मुंबईच्या टिळक भवनात बंजारा टायगर Banjara Tiger संघटनेचे आज कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण झाले. बंजारा टायगर सोबत आल्याने आता राज्यात आणि देशात कॉंग्रेसची सत्ता आणणे सोपे झाले आहे. टायगरची एक जागा ठरलेली नसते, तर टायगर जेथे जाऊन ‘पंजा’ मारतो, तेथेच त्याचे साम्राज्य तयार होते, wherever tiger hits his paw his empire his formed  असे म्हणत पटोले यांना बंजारा नेत्यांमध्ये जोश भरला.
 
या कार्यक्रमात बंजारा नेत्यांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवूनच दम घेऊ, असा निर्धार केला. त्यावर बोलताना नाना म्हणाले, तुमच्या भावनांचा आदर करतो. पण मला खुर्चीची चिंता तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. मी खासदारकीची खुर्ची एका क्षणात सोडली आणि विधानसभा अध्यक्षाचीही खुर्ची सोडून आलो आहे. कारण मला चिंता आहे ती माझ्या बहुजनांची. बंजारा टायगर संघटनेचे अध्यक्ष आत्माराम जाधव आणि महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज बंजारा टायगर कॉंग्रेसमय केली आहे. या संघटनेने टायगर हा शब्द असाच लावला नाही, तर खऱ्या अर्थाने हा समाज वाघासारखा लढणारा आहे. आज या लोकांनी जे केले, ती काळाची गरज आहे. पूर्वीच्या घराण्यात जन्मलेलाच राजा व्हायचा. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आज सामान्य माणुसही राजा बनू शकतो. आणि तेच संविधान मोडायला काही लोक निघाले आहेत. संविधान वाचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. विधानसभा अध्यक्ष या पदाला एक मर्यादा असल्यामुळे ती खुर्ची सोडून बहुजनांसाठी मी मैदानात उतरलो आहे. 

आता लोकच फडणवीसांना सन्यास देतील... 
फडणवीसांनी २०१४ मध्ये धनगर समाजाला शब्द दिला होता, तुम्हाला आरक्षण देऊ, तो पाळला नाही. त्यानंतर ओबीसींनाही तसाच शब्द दिला होता. तोसुद्धा पाळला नाही. आज ओबीसींच्या आरक्षणाची काय स्थिती आहे, हे सर्व जण बघताहेत. त्यामुळे ‘सत्ता द्या ४ महिन्यांत ओबीसी आरक्षण देतो’, ही फडणविसांनी घोषणा फसवी आहे. त्यामुळे भाजपला उखडून फेकण्याचे काम आता आपल्या सर्वांना मिळून करायचे आहे. देशात आणि राज्यात आपल्याला आपली सत्ता आणायची आहे. त्याचा वाटा शोषित पीडितांपर्यंत पोहोचवायचा आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे हा कार्यक्रम मर्यादित लोकांमध्ये झाला. ही स्थिती नसती तर हेच विलीनीकरण लाख लोकांच्या मेळाव्यात झाले असते, असे पटोले म्हणाले. कॉंग्रेसने गेल्या ७० वर्षात तयार केलेली व्यवस्था मोदी सरकारने कवळ ७ वर्षांत मोडीत काढली असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.  

कॉंग्रेसकडे काही मागायची गरज नाही, आपोआप सर्व मिळतं..
आज नाना पटोलेंच्या माध्यमातून आपली चांगली वेळ आली आहे. कॉंग्रेसची ताकत निश्‍चितपणे वाढणार आहे. नाना पटोलेंना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्धार यावेळी बंजारा नेत्यांनी केला. महाराष्ट्रात कॉंग्रेसला पटोलेंसारख्या नेतृत्वाची गरज होती, ती गरज सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ओळखली. त्यामुळे आता कॉंग्रेसचे नंबर वन होणार आहे. एक आमदार झाला आणि बंजारा समाज खूष झाला, असे होणार नाही. कारण बंजारा समाजाची ताकत मोठी आहे. ४० ते ४५ ठिकाणी आमचे लोक मोठ्या संख्येने आहे. तेथे आपले आमदार निवडून येऊ शकतात, असे बंजारा नेत्यांनी पटोले यांना सांगितले.  

बंजारा समाज हा कॉंग्रेसला समर्पित आहे. स्व. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असतानाही समाजाने कॉंग्रेसला मोठे करण्याचे काम केले आहे. प्रताप आडे, किसन राठोड, हरीभाऊ राठोड, अलका राठोड, संजय राठोड अशी कितीतरी नावे या श्रुंखलेमध्ये घेता येतील. मध्यंतरी कॉंग्रेसने बंजारा समाजाकडे दुर्लक्ष होते. पण आपल्याला विधान परिषदेवर पाठवून पक्षाने हे सिद्ध केले की, आपल्या समाजाकडे दुर्लक्ष नाही. भाजप, शिवसेनेसारख्या विचारधारेच्या लोकांकडे गेलो होतो, ही आपली चूक होती. पण आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला सिद्ध करावे लागणार आहे की, समाज कॉंग्रेससोबत आहे. २०१४ मध्ये बंजारा समाजाची फसवणूक करण्यात आली.

आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याचा शब्द आपल्याला दिला होता. पण केंद्रात ७ वर्ष सत्ता उपभोगूनही सरकारने आपल्याला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे आपल्याला विद्यमान केंद्र सरकारच्या विरोधात मोठा संघर्ष उभारावा  लागणार आहे, असे आमदार राजेश राठोड म्हणाले. कार्यक्रमाला कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, कॉंग्रेस नेते देवानंद पवार, जिल्हाध्यक्ष रवी बोंद्रे, हमीद शेख, राजू वाघमारे, तेजेंद्र चव्हाण, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, वाल्मीक पवार, गजानन जाधव, डॉ, देसाई, रमेश जाधव. भिमराव राठोड, राकेश पाटील आदी उपस्थित होते. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com