वंचितच्या कार्यकर्त्यांनी लाथा मारून तोडले आयुक्तांच्या कार्यालयाचे गेट...

दुपारी ३ वाजेपर्यंत शांततेच्या मार्गाने धरणे दिल्यानंतरही मनपा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार होते. मात्र, निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीही अधिकारी आले नाही.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

अकोला : आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महानगरपालिका आयुक्तांना Commissioner of Municiple Corporation देण्यासाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना रोखले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी लाथा मारून आयुक्तांच्या कार्यालयाचे गेट तोडले Vanchit activists kiked and broken the gate आणि प्रवेश मिळविला. निवेदन न स्विकारल्यामुळे कार्यकर्ते चिडलेले होते. 

आज अकोल्यातील महापालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात नागरिकांसह वंचितचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान निवेदन देण्यासाठी जात असलेल्या कार्यकर्त्याना महापालिका कर्मचाऱ्यांनी अटकाव केल्याने. वंचितच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गेट तोडून प्रवेश केला. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पुरग्रस्त व वंचित राहलेल्या घरकुल लाभार्थी यांच्या प्रश्नावरील निवेदन मनपाच्या वतीने स्विकारल्या न गेल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 

महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाली आहे असा आरोप करत, सत्तेत सहभागी सत्ता पक्षाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक एकत्र आले. या आंदोलनामध्ये शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे कुणीही उपस्थित नसल्याने दुपारी ३.३० वाजता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपाचे मुख्य प्रवेशद्वारा तोडून कार्यालयात हल्लाबोल केला. 

रस्ते, स्वच्छता, पाणी, टॅक्स, घरकुल, दिवे, कचरा या सर्वच समस्यांवर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष अपयशी ठरला आहे. आता हा भ्रष्टाचार महापालिकेतून हद्दपार करण्यासाठी अकोल्यातील जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याच्या कारणावरून वंचित बहुजन आघाडी हा मोर्चा महापालिकेवर काढला. या आंदोलनामध्ये वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, युवक आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, ज्ञानेश्वर सुलताने, बालमुकुंद भिरड, ॲड. संतोष रहाटे, मनोहर पंजवाणी, बबलू जगताप, किरण बोराखडे, पराग गवई, माणिक शेळके, मनोहर बनसोड, ॲड. आकाश भगत, गजानन गवई, बुद्धरत्न इंगोले, जीवन डिगे, मंतोष मोहोड यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दुपारी ३ वाजेपर्यंत शांततेच्या मार्गाने धरणे दिल्यानंतरही मनपा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार होते. मात्र, निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीही अधिकारी आले नाही. मनपाचे मुख्य प्रवेशद्वारावरील लोखंडी गेटही सुरक्षा रक्षकांनी बंद करून घेत वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांच्या विरोधाला न जुमानता गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, सिटी कोतवाली पोलिसांचा ताफा उपस्थित असतानाही गेट तोडून पदाधिकारी व कार्यकर्ते आत शिरले. त्यांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचा व सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. 
 

या आहेत आंदोलनातील प्रमुख मागण्या : 
- महानगरातील गरिबांची घरकुल पूर्ण करण्यात यावे. 
- पूरग्रस्त भागातील नागरिकांचे सर्वेक्षण पुन्हा करण्यात यावे. 
- पूरग्रस्तांचे वीज बिल माफ करावे. 
- डाबकी रोड व बिर्ला रेल्वे गेट उड्डामण पुलाचे काम तत्काळ करावे. 
- महिला बचत गटांना कर्ज माफ करून वाढीव अनुदान व कर्जाचे वितरण करावे. 
- मनपामध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार काम करत आहे. त्यांना मनपामध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. 
- दलित वस्ती सुधार योजना. 
- पडीक वॉर्डमधील कामांची चौकशी लावून त्याचे सोशल ऑडिट करण्यात यावे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com