पदोन्नतीबाबतचा निर्णय सकारात्मक करण्याचा प्रयत्न : डॉ. नितीन राऊत

जेव्हाही अशा आजारांची लाट येते. पहिली लाट जेव्हा आली होती, तेव्हाही सुरुवातीच्या काळात मृत्यू झाले नाहीत. नंतर हळूहळू मृत्यूसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. ही लाट जेव्हा ओसरायला लागली, तेव्हा मृत्यूसंख्या हळूहळू ओसरायला लागली. दुसऱ्या लाटेतही आपण हाच अनुभव घेतो आहोत.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्‍न अजूनही कायम आहे. याविषयी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाटबंधारे मंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानतो. कारण त्यांच्याच प्रभावाने आणि पुढाकाराने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीसंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे आणि येत्या सोमवारी त्यासंदर्भात बैठक होणार आहे. यामध्ये संबंधित तांत्रिक मुद्द्य़ांवर आम्ही चर्चा करणार आहोत. त्या जीआरमध्ये जो संभ्रम आहे, त्यावर चर्चा झाल्याशिवाय त्यामध्ये दुरुस्ती होणे शक्य नाही. त्यामुळे पदोन्नतीबाबतचा निर्णय सकारात्मक कसा करता येईल, असाच आमचा प्रयत्न राहणार आहे, असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आज येथे म्हणाले.

डॉ. राऊत म्हणाले, म्युकरमायकोसीसची औषधे खूप महागडी आहेत आणि अनेकांना आज उपचाराची गरज आहे. त्यामुळे यासाठी एक प्रभावशाली योजना तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. या आजारावरची औषधी खूप महाग आहेत आणि तत्काळ उपचारांची गरज असते. गरिबांना माफक दरांमध्ये उपचार मिळाले पाहिजेत, यासंबंधीच्या सूचना प्रशासनाला आजच्या बैठकीत दिल्या आहेत. म्युकरमायकोसीसला प्रतिबंध करणारी औषध निर्माण करणारी एकच कंपनी सध्या आहे आणि मुंबईत आहे आणि तीच कंपनी सध्या औषधींचा पुरवठा करीत आहे. पण आता वर्धेच्या एका कंपनीला या आजारावरची प्रतिबंध करणारी इंजेक्शनची निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे. 

आज आपण नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. यामध्ये मोठा वाटा नागपूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचा आहे. सोबतच नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे या सर्वांनी दिवसरात्र एक करून यासाठी प्रयत्न केले. आज रुग्णसंख्या आणि मृत्यूदर जरी कमी होताना दिसत असला, तरी संकट अजून टळलेले नाही. त्यातल्या त्यात तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे येवढ्या यशाने कुणीही हुरळून जाण्याचे कारण नाही. राज्य सरकारने घालून दिलेले प्रतिबंध प्रत्येकाने तंतोतंत पाळावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. 

जेव्हाही अशा आजारांची लाट येते. पहिली लाट जेव्हा आली होती, तेव्हाही सुरुवातीच्या काळात मृत्यू झाले नाहीत. नंतर हळूहळू मृत्यूसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. ही लाट जेव्हा ओसरायला लागली, तेव्हा मृत्यूसंख्या हळूहळू ओसरायला लागली. दुसऱ्या लाटेतही आपण हाच अनुभव घेतो आहोत. या आजाराचे एक वळण लक्षात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेतही मृत्यूसंख्या लवकरच कमी होत जाईल, याचा विश्‍वास आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना सर्वाधिक आहे, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यासाठी आम्ही प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र विभाग तयार करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे डॉ, नितीन राऊत यांनी सांगितले. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com