लशींची टंचाई दोन महिन्यांत संपविण्यासाठी हा आहे मेगा प्लॅन

सरकार म्हणते त्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर ऑगस्ट ते डिसेंबर या काळात दररोज किमान ९० लाख नागरिकांचे एका टप्प्याचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. सध्या हे प्रमाण रोज १७ लाख एवढेच आहे.
Mega plan for end the shortage of Corona vaccines in two months
Mega plan for end the shortage of Corona vaccines in two months

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccine) मोहिमेअंतर्गत या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील आणि राहिलेल्या सुमारे ९५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्‍चित केले आहे. सध्या जाणवत असलेली कोव्हिशिल्ड (Covid Shield), कोव्हॅक्सिन (Co-Vaccine) आणि स्पुतनिक (Sputnik) या तिन्ही लशींची टंचाई दूर व्हावी म्हणून त्यांचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी केंद्राने कंबर कसली आहे. येत्या दोन महिन्यांत लशींची कमतरता बऱ्यापैकी दूर होईल, असा विश्वास एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया (AIIMS Director Dr. Randeep Guleria) यांनी व्यक्त केला आहे.

सध्या देशात दोन लशी उपलब्ध आहेत आणि रशियाची स्पुतनिक लस पुढच्या आठवड्यापासून देण्यास सुरुवात केली जाईल. याशिवाय विविध राज्यांमध्ये लशींचे परवाने उपलब्ध करण्याचा पर्याय केंद्राच्या पातळीवर गांभीर्याने घेण्यात आला आहे. सरकार म्हणते त्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर ऑगस्ट ते डिसेंबर या काळात दररोज किमान ९० लाख नागरिकांचे एका टप्प्याचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. सध्या हे प्रमाण रोज १७ लाख एवढेच आहे.

अशा उपलब्ध होणार लशी (प्रमाण कोटींमध्ये) : मे- ८.३०, जून- १०,  जुलै- १५, ऑगस्ट- ३६, सप्टेंबर- ५०, ऑक्टोबर-५६, नोव्हे - ५९,  डिसेंबर- ६५
(नोट ः ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोस उपलब्ध होतील.)

स्पुतनिकचे वाढीव डोस...

स्पुतनिक लसीचे मे महिन्यात ६० लाख डोस रशियाकडून मिळणे अपेक्षित आहेत. याशिवाय सप्टेंबर- ऑक्टोबर पर्यंत या लसीचे दरमहा १ ते १.५ कोटी डोस भारताला उपलब्ध होतील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार लस उत्पादनाच्या विकेंद्रीकरण धोरणाला केंद्राने गती दिली आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांमध्ये राज्यांना जाणवणारी लशींची टंचाई दूर होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com