उपराजधानीत थरार; स्वयंदीपच्या खुनाचा १२ तासांत घेतला बदला, शक्तिमान आयसीयूत...

शहराची क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. शहरात एका दिवसाआड खून होतच असतो. यामुळे पोलिसांसह शहराची महाराष्ट्रात चांगलीच बदनामी झाली. मात्र, येथील गुन्हेगारीवर पोलिसांना कोणतेही अंकुश आणता आलेले नाही.
Murder
Murder

नागपूर : शहरातील कौशल्या नगर Koushlya Nagar of the city परिसरात काल रात्री स्वयंदीप नगराळे Swyamdeep Nagrale या २१ वर्षीय युवकाचा परिसरातील ७ ते ८ युवकांनी खून केला. या खुनाचा मुख्य आरोपी शक्तिमान गुरूदेव Shaktiman Gurudev हा नंतर फरार झाला. स्वयंदीपच्या मित्रांनी रातोरात त्याला हुडकून काढले आणि जेथे शक्तीमानने स्वयंदीपचा खून केला होता, तेथेच दगडांनी ठेचून शक्तीमानला मारले. तो अजूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात व्हेंटीलेटर असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. His condition is critical. 

शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीचा वाढता आलेख आजच्या घटनेने उघड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कौशल्या नगर परिसरात स्वयंदीप नगराळे नावाच्या 21 वर्षीय युवकाचा परिसरातील 7 ते 8 युवकांकडून खून करण्यात आला. या घटनेत अजनी पोलिसांनी तात्काळ 3 आरोपींना अटक केली, मात्र या खुनातील मुख्य आरोपी शक्तिमान गुरुदेव हा फरार झाला. परिसरातील काही युवकांना तो भांडे प्लॉट चौकाजवळ आपल्या नातेवाइकाच्या घरी लपून असल्याची माहिती मिळाली. या युवकांनी भांडे प्लॉट चौकातून शक्तीमानला पकडून कौशल्या नगर परिसरात आणले आणि त्याला मारहाण करत त्या दगडांनी ठेचले. 

स्वयंदीप शुक्रवारी रात्री जेवण करून घराबाहेर शेजारच्या ऑटोमध्ये बसला असताना त्याच्यावर 7 युवकांकडून शस्त्रानिशी हल्ला करण्यात आला. त्यातच स्वयंदीपचा मृत्यू झाला. आरोपी शक्तीमानचा परिसरात दबदबा होता आणि त्याच्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. तर काही ठिकाणी अवैध जुगार अड्डा या हत्येच्या मागील खरे कारण असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत गेल्या 12 तासांत शहरात झालेल्या थरारक हत्याकांडाने शहरात दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. तर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटना स्थळावर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

शहराची क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. शहरात एका दिवसाआड खून होतच असतो. यामुळे पोलिसांसह शहराची महाराष्ट्रात चांगलीच बदनामी झाली. मात्र, येथील गुन्हेगारीवर पोलिसांना कोणतेही अंकुश आणता आलेले नाही. 

पोलिसांच्या नाकावर टिचून खून 
नागपुरात खुनाची घटना आता काही नवीन राहिलेले नाही. रोजच खून होते, अशीच स्थिती शहरात निर्माण झाली आहे. मात्र, यावर पोलिसांचे कोणतेही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेले नाही. स्वयंमचा खून झाल्यानंतर पोलिस परिसरातच आरोपींचा शोध घेत होते. असे असतानाही स्वयमच्या मित्रांनी शक्तिमानला खून केलेल्या ठिकाणी नेऊन त्याचा खून केला. पोलिसांच्या नाकावर टिचून खून झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com