रात्री उशिरा आमची पोरं तेथे पोचली, अन् पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलवली...

कॉंग्रेस हा पक्ष लोककल्याणासाठी आहे, हे आमच्या कामांतून वारंवार सिद्ध झाले आहे. सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे. ती निसर्गाची छेडखानी केल्यामुळे होते. ढगफुटीसारखे प्रकार निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे होतात.
रात्री उशिरा आमची पोरं तेथे पोचली, अन् पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलवली...
Nana Patole

नागपूर : सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील जांभळी या गावात पुराने थैमान घातले असतानाही तेथे प्रशासन पोहोचलेच नाही, हे खरे आहे. पण आमचे युवक कॉंग्रेसचे पोरं जांभळीत पोहोचले. रात्री उशिरा ते जेसीबी घेऊन गेले आणि पुराचे पाणी जे गावात जात होते, त्या पाण्याची दिशा त्यांनी बदलविली आणि गाव वाचवले. They changed the flow of floodwater and save the village असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of congress Nana Patole आज येथे म्हणाले. 

युवक कॉग्रेसचे पदाधिकारी जांभळीत वेळेत पोहोचले नसते, तर या गावातही जीवहानी होऊ शकली असती. कॉंग्रेस हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. ‘मी आलो होतो, अन् मी गेलो होतो’, असे थातूरमातूर काम आम्ही कधीच करीत नाही. तर ते आमच्या विरोधी पक्षाचे काम आहे, असे म्हणत नानांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांना टोला हाणला रात्री उशिरा जेव्हा वाई तालुक्यात गेलो, तेव्हा भर पावसात युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी ओलेचिंब होऊन मदतकार्य करीत होते. मी त्यांना शाबासकी देऊन आलो, असे पटोले म्हणाले. 

कॉंग्रेस हा पक्ष लोककल्याणासाठी आहे, हे आमच्या कामांतून वारंवार सिद्ध झाले आहे. सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे. ती निसर्गाची छेडखानी केल्यामुळे होते. ढगफुटीसारखे प्रकार निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे होतात. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि उत्खनन यांचाही प्रभाव निसर्गावर होत असतो. या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पहाडी भागात उत्खनन कशा पद्धतीने केले पाहिजे, झाडे कशी जोपासली गेली पाहिजे. याचे धोरण सरकारने ठरवण्याची वेळ आता आली असल्याची गरजही पटोलेंनी बोलून दाखविली. 

पहाड कोसळलेल्या ठिकाणी मलब्याखाली प्रेते दबलेली आहेत. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात ढगफुटी आणि पुरामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, सरकार तेथील लोकांना पूर्णपणे मदत करीत आहे. मुख्यमंत्री स्वतः कंट्रोल रुममधून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि नुकसानग्रस्त भागाचा दौराही त्यांनी केला आहे. त्यामुळे या घटनांचे कुणी राजकारण करू नये. ही लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची वेळ आहे. त्यांचे दुःख वाटून घेऊन कमी करण्याची वेळ आहे. झालेल्या नुकसानातून लोकांना सावरून घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नाना पटोले म्हणाले. 

२०१९ मध्ये यापेक्षाही भयावह स्थिती होती. मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी होते, मुंबईतही लोक वाहून गेली होती आणि त्यावेळी जनादेश यात्रा निघाली होती. पण अशी वेळ ही राजकारणाची नसते, तर लोकांच्या मदतीला धावून जाण्याची असते. त्यामुळे कुणी, केव्हा, काय केले. याचा विचार आम्ही करत नाही, तर आत्ता काय केले पाहिजे, त्याला महत्व देतो आणि तेच काम सध्या करत आहोत, असे पटोले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in