नागपूर जिल्ह्यातील ‘या’ ५९ गावांनी कोरोनाला आपल्या आसपासही फटकू दिले नाही...

कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करतानाच गावातील स्वच्छता, सामाजिक अंतर याला प्राधान्य दिले आहे. इतर गावांतून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून कोरोनाची लक्षणे असल्यास प्रतिबंध घालणे, आदी उपाययोजना या गावांनी केल्या आहेत. कोरोनाला दूर ठेवणाऱ्या जिल्ह्यातील ५९ गावांचा आदर्श सर्व गावांनी घ्यावा.
Corona NGP Ziro Mile
Corona NGP Ziro Mile

नागपूर : मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झाला होता. त्यातून प्रशासन आणि जनता सावरते न सावरते तोच यावर्षी पुन्हा कोरोनाने हाहाकार माजवला. Whether the administration and the people recover or not, Corona cried again this year शहरांसह गावेच्या गावे कोरोनाबाधित झाली. पण भयावह असलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यातील अशी ५९ गावे आहेत, की ज्यांनी कोरोनाला आपल्या आपसपासही फटकू दिले नाही. याचे श्रेय त्या गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले. 

कोरोनामुळे बहुतांश गावे तसेच शहरे बाधित होऊन मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढली. पण असे असताना जिल्ह्यातील ५९ गावांनी कोरोनाला आपल्या गावात प्रवेश दिला नाही. या गावांमध्ये मागील वर्षीच्या मार्चपासून एकाही नागरिकाला कोरोनाची लागण झाली नाही. गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून केलेल्या उपक्रमामुळे या गावांत कोरोना पोहोचू शकला नसल्याचे कुंभेजकर यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे बाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश मिळाले. असे असले तरी दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील नागरिक बाधित झाले. योग्य मार्गदर्शन तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. बाधितांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाबाधित झाल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये काळी बुरशीसारखे आजार निदर्शनास येत आहेत. जनतेने अशा आजाराबद्दल तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन कुंभेजकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील १,६०५ गावांपैकी ५९ गावे कोरोनापासून दूर राहिली आहेत. या गावांमध्ये मागील वर्षाच्या मार्चपासून एकही रुग्ण आढळलेला नाही अथवा कोणीही बाधित झालेले नाही. कोरोनाला दूर ठेवणाऱ्या गावांमध्ये काटोल तालुक्यातील सर्वाधिक ११ गावांचा समावेश आहे. त्याबरोबरच नागपूर तालुक्यातील १० गावांनी कोरोनाला थोपविण्यात यश मिळविले आहे. हिंगणा तालुक्यातील ११९ गावांपैकी ७ गावांमध्ये कोरोनाची बाधा झालेली नाही.  कळमेश्वर तालुक्यातील ८६ गावांपैकी ३ गावे, भिवापूर तालुक्यातील १०६ गावांपैकी २ गावे, कामठी तालुक्यातील ७८ गावांपैकी २, मौदा तालुक्यातील १२४ गावांपैकी ६, नागपूर तालुक्यातील १३४ गावांपैकी १०, नरखेड तालुक्यातील ११८ गावांपैकी ४ गावे, पारशिवनी तालुक्यातील १०७ गावांपैकी १ गाव,  रामटेक तालुक्यातील १५२ गावांपैकी ८ गावे , सावनेर तालुक्यातील १३६ गावांपैकी १ गाव तर उमरेड तालुक्यातील १३८ गावांपैकी ४ गावांनी कोरोनाला वेशीवरच थांबविले आहे. 

कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करतानाच गावातील स्वच्छता, सामाजिक अंतर याला प्राधान्य दिले आहे.  इतर गावांतून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून कोरोनाची लक्षणे असल्यास प्रतिबंध घालणे, आदी उपाययोजना या गावांनी केल्या आहेत. कोरोनाला दूर ठेवणाऱ्या जिल्ह्यातील ५९ गावांचा आदर्श सर्व गावांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com