प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प केल्यास राजकारणाची दशा आणि दिशा बदलली जाऊ शकते... 

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दृढ संकल्प केल्यास राजकारणाची दशा आणि दिशा बदलली जाऊ शकते, हे मोदी सरकारने सिद्ध केले,
Narendra Modi
Narendra Modi

नागपूर : नरेंद्र मोदी Narendra Modi यांचे सरकार सत्तेत येऊन सात वर्ष झाले. या काळात त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आणि जागतिक स्तरावर देशाचा मान वाढवला. Increased the country's prestige globally त्यापूर्वी एक काळ असा होता की, कोणत्याही पंतप्रधानांना निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा लागत असे. पण मोदी सरकारने ही अवस्था बदलली. But the Modi government changed this situation प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दृढ संकल्प केल्यास राजकारणाची दशा आणि दिशा बदलली जाऊ शकते, हे मोदी सरकारने Modi Government सिद्ध केले, असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ता पैनलिस्ट चंदन गोस्वामी Chandan Goswami यांनी व्यक्त केले. 

मोदी सरकारने घेतलेले मोठे निर्णय गोस्वामी यांनी पुढीलप्रमाणे सांगितले -
नोटाबंदी
नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी एस साहसी निर्णय घेत देशात नोटाबंदी लागू केली. या निर्णयामुळे देशात तेव्हाच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर देशात डिजिटल अर्थकारण वाढीस लागले आणि लोक डिजिटल व्यवहारांकडे वळले. 

सर्जिकल स्ट्राईक
२८ सप्टेंबर २०१६ ला आतंकवाद समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने पकिस्थानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याचा आणखी एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला. या निर्णयाने जगाला दाखवून दिले की, आतंकवाद नष्ट करायचा असेल, तर काय केले पाहिजे. सन १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदा भारतीय सैन्याने सीमा ओलांडली होती. भारतीय सैन्याचा हा पराक्रम सर्व जगाने पाहिला.

जीएसटी लागू करून एक टॅक्स करण्याचा निर्णय
१ जुलै २०१७ ला जीएसटी लागू करून देशात एक कर व्यवस्था लागू करण्यात आली. या कायदा अमलात आल्यानंतर देशात वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्स वसुलीपासून मुक्ती मिळाली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर प्रणालीमधील विसंगती दूर झाल्या आणि देशात एकसारख्या कर प्रणालीचे चलन सुरू झाले. 

तीन तलाकची प्रथा बंद
पिढ्यानपिढ्यांपासून सुरू असलेली तीन तलाक सारखी कुप्रथा संपवली. असे करणे म्हणजे गुन्हा आहे, अशी घोषणा करून या प्रथेचा अंत करण्याचा पूर्ण प्रयत्न मोदी सरकारने केला. असे करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूदही कायद्यात करण्यात आली. येवढेच नव्हे तर तीन तलाकच्या प्रथेमुळे पिडीत झालेल्या महिलांना भत्ता देण्याचीही व्यवस्था केली. 

जम्मू काश्‍मीरमधून कलम ३७० हटवले
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केले. ५ ऑगस्ट २०१९ ला लागू केलेल्या या निर्णयानंतर जम्मू आणि काश्‍मीर भारताचा अंग बनला आणि संपूर्ण देशात जे कायदे लागू आहेत, ते जम्मू आणि काश्‍मीरसाठीदेखील लागू झाले. 

नागरिकता संशोधन अधिनियम
मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या गैरमुस्लीम प्रवाशांना नागरिकता देण्यासाठी १० जानेवारी २०२० रोजी नागरिकता संशोधन कायदा लागू केला. हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी देशात येणाऱ्या गैरमुस्लीम प्रवाशांना भारताचे नागरिकत्व द्यायचे असल्यास ११ वर्ष निवास करणे बंधनकारक होते. पण केंद्र सरकारने आपल्या देशात पिडीत असलेल्या लोकांसाठी हा कालावधी घटवून ६ वर्षांचा केला. 

सरकारी बॅंकांचे विलीनीकरण
केंद्र सरकारने देशात मोठ्या आर्थिक सुधारणा करीत १ एप्रिल २०२० ला १० सरकारी बॅंकांना ४ मोठ्या बॅंकांमध्ये विलीन केले. हा कायदा लागू झाल्यानंतर बॅंकांना एनपीएमधून दिलासा मिळाला आणि ग्राहकांना चांगली बॅंकींग सुविधा मिळायला लागली. महत्वाची बाब म्हणजे या निर्णयामुळे बॅंकांचा खर्च कमी झाला आणि उत्पादकता वाढली. 

जन-धन योजना
देशातील जास्तीत जास्त लोकांना बॅंकींगसोबत जोडण्यासाठी  
सरकारने २८ ऑगस्ट २०१४ ला जन धन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ३१.३१ लोकांचे खाते बॅंकांमध्ये उघडले गेले आणि बॅंकांनी वंचित लोकांचे खाते उघडून बॅंकींग सुविधांसोबत त्यांना जोडण्याचे काम केले. 

सवर्णांना १० टक्के आरक्षण
सवर्णांना आरक्षण देण्याची मागणी देशात फार पूर्वीपासून होत होती. पण आजपर्यंत आलेल्या एकाही सरकारने या विषयाला हात घातला नव्हता. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळातच सवर्ण समुदायाला आर्थिकतेच्या आधारावर १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हे आरक्षण संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित करून १ फेब्रुवारी २०१९ ला त्याला अंतिम स्वरूप दिले. सरकारच्या या निर्णयामुळे सवर्णांना सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आरक्षणाचा लाभ मिळाला. 

भारताला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख
मोदी सरकार आल्यानंतर जगातील इतर देशांसोबत भारताचे संबंध सुधारले आणि देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळाली. मोदींनी ५० पेक्षा जास्त देशांचे दौरे केले. अमेरिकेसोबत भारताचे संबंध अधिक घट्ट झाले. सौदी अरबपासून ते युएईसह इस्लामिक देशांना मोदींना पुरस्कारांनी सन्मानित केले. इस्लामिक देशांसोबत भारताचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com